
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्झमबर्गच्या (Luxembourg) स्पेशल रेफ्रिजिरेटेड ट्रान्सपोर्टेशन प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे.
नवी दिल्ली- कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी कोरोना लशीची उपलब्धतता लवकरच होणार आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्झमबर्गच्या (Luxembourg) स्पेशल रेफ्रिजिरेटेड ट्रान्सपोर्टेशन प्लांट उभा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार हा ट्रान्सपोर्टेशन प्लांट गुजरातमध्ये उभा केला जाण्याची योजना आहे.
दिल्ली आणि अहमदाबाद स्थित अधिकारिक सूत्रांच्या माहितीनुसार, लक्झमबर्ग फर्म बी मेडिकल सिस्टम्स वॅक्सिन रेफ्रिजरेटर, फ्रीजर आणि ट्रान्सफोर्ट बॉक्स याच्यासह कोल्ड चेन स्थापित करण्यासाठी एक उच्च स्तरीय टीम पुढील आठवड्यात गुजरातमध्ये पाठवत आहे. अशा प्रकारचा सुसज्ज प्रकल्प उभा करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. कंपनी प्रशीतन बॉक्स तयार करणार आहे. प्रशीतन बॉक्स शून्याच्या खाली चार डिग्री सेल्सियस ते 20 डिग्री सेल्सियसदरम्यान डिलीव्हरी करण्यास सक्षम आहे. लक्झमबर्ग कंपनीकडे शून्य ते 80 डिग्रीच्या खाली वॅक्सिन ट्रान्सपोर्टचीही क्षमता ठेवते.
बॉक्स मार्चमध्ये तयार होण्याची शक्यता
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर लक्झमबर्गच्या प्रस्तावावर स्वत: लक्ष्य ठेवून आहेत. यूरोपीय संघातील भारताचे राजदूत संतोष झा यांनी गुजरातमधील व्यवस्थेला अंतिम रुप देण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप-सीईओ यांची भेट घेतली होती.
व्होडाफोन-आयडियाचे ग्राहक Reliance Jio कडे; यावर्षी जोडले 9 कोटी सब्सक्राईबर्स
19 नोव्हेंबरला लक्झमबर्गने प्रधानमंत्री मोदी यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी द्विपक्षीय शिखर संम्मेलनादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्यासमोर बेटेल यांनी प्रस्ताव ठेवला होता. कोरोनाचे संकट लक्षात घेता मोदींना हा प्रस्ताव स्विकारला असल्याचे सांगितले जाते. शिवाय गुजरातसोबत संपर्क ठेवून असलेली कंपनी आणि लक्झेमबर्ग कंपनी यांच्यातर्फे प्रस्ताव ठेवण्यात आला.
दरम्यान, लक्झेमबर्ग ही एक आघाडीची वैद्यकीय क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1979 मध्ये करण्यात आली होती. कंपनी ब्लड बँक आणि प्लाझ्मा स्टोरेज रेफ्रिजरेटरमध्येही जगात सर्वात पुढे आहे. भारतीय कंपनी लक्झेमबर्ग सोबत मिळून काम करणार असून यातून आत्मनिर्भर भारत योजनेलाही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.