donald trump main 1.jpg 
ग्लोबल

US President Election: मीच जिंकलो ! डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही पराभव अमान्य

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन US President Election 2020- एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयाचा जल्लोष करत आहेत. तर दुसरीकडे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव अमान्य आहे. बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतर तब्बल 6 तास मौन साधल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन स्वतःच्या विजयाचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. 

ट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले की, पर्यवेक्षकांना मतमोजणी खोलीत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. ही निवडणूक मी जिंकली आहे आणि मला 7 कोटी 10 लाख वैध मते मिळाली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नाही.

ट्रम्प यांनी मेल इन बॅलेट्सच्या माध्यमातून बनावट मतदान झाल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. टि्वटमध्ये त्यांनी पुढे म्हटले की, लाखोंच्या संख्येने नागरिकांना मेल-इन बॅलेट्स पाठवण्यात आली. विशेष म्हणजे या नागरिकांनी याची मागणीच केली नव्हती. 7 कोटी 10 लाख मतं...राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मिळालेली ही विक्रमी मतं आहेत. दरम्यान यापूर्वी ट्रम्प यांनी मेल-इन बॅलेट्सच्या मोजणीवर प्रश्न उपस्थित केले होते. 

ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीही स्वतः निवडणूक जिंकल्याची घोषणा केली होती. बनावट मतांच्या जोरावर निवडणूक चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर तुम्ही वैध मते मोजली तर मी आरामात जिंकत आहे. पण जर तुम्ही अवैध (मेल इन बॅलेट्स) मतं मोजाल तर ते (डेमोक्रॅट) या माध्यमातून आमचा विजय हिसकावून घेण्याचा प्रयत्न करु शकतात, असे म्हटले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hailstorm Strong Wind : पाचोडसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित; आंबा-मोसंबी बागांचे नुकसान

Parli Vaijnath News : परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा त्रिशूल मध्य प्रदेशातील भाविकांकडून अर्पण

Pune FDA Raid : भेसळखोरांवर ‘एफडीए’ ची धाड; सत्‍तेचाळीस लाखांचा संशयित खवा, पनीर आणि तूप जप्त

Wagholi Fraud News : नोकरी देतो म्हणून दिवाळखोर कंपनीत नोकरी देऊन अनेकांची ४४ लाख रुपयांची फसवणूक; दोन कंपन्यांच्या मालकासह संचालकांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update: माळेगाव कारखान्याने शेतकऱ्यांना २०० रुपये कांडे पेमेंट केले जाहीर

SCROLL FOR NEXT