USA Sakal
ग्लोबल

USA: सोशल मीडिया सेलिब्रिटीमुळे अमेरिकेत उसळली दंगल; वाहनांची तोडफोड, अनेक जण जखमी

USA Social Media Influencer Kai Cenat: दंगलीच्या आरोपाखाली अनेक तरुणांना अटक करण्यात आली आहे.

राहुल शेळके

USA Social Media Influencer Kai Cenat: शुक्रवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर गोंधळाचे आणि दंगलीचे वातावरण होते. प्रत्यक्षात तरुणांचा मोठा जमाव रस्त्यावर जमला होता आणि काही वेळातच हाणामारी आणि दगडफेक सुरू झाली. अनेक लोक जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हे सर्व एका सोशल मीडिया सेलिब्रिटीच्या पोस्टमुळे घडले.

काय आहे प्रकरण?

रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध यूट्यूबर काई सेनेटने एका व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामवर लाइव्ह केले आणि सांगितले की तो लोअर मॅनहॅटनमध्ये त्याच्या चाहत्यांना भेटेल आणि त्यांना भेटवस्तू देईल. या भेटवस्तूंमध्ये, काई सेनेटने प्ले स्टेशन देण्याबद्दल सांगितले होते.

काई सेनेटचा हा व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल झाला आणि युट्युबरने नमूद केलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण जमा होऊ लागले. काई सेनेटचे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो सबस्क्राइबर्स आहेत.

हजारो लोक जमले

यूएस मीडियानुसार, सुमारे 2,000 तरुणांचा जमाव लोअर मॅनहॅटनमधील युनियन स्क्वेअरवर प्रसिद्ध YouTuberला पाहण्यासाठी आणि भेटवस्तू घेण्यासाठी जमला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हजारोंचा जमाव जमला असताना काही तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दगडफेकीत अनेक जण जखमी झाले. दंगलीची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

अनेकांना अटक

न्यूयॉर्क शहराचे पोलिस प्रमुख जेफ्री माडेरे यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि अनेक लोक जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दंगलीच्या आरोपाखाली अनेक तरुणांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT