Twitter Stock Trading: ट्विटरवर होणार शेअर्सचे व्यवहार? इलॉन मस्कने स्पष्टच सांगितलं

Twitter Stock Trading: ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क त्यात सातत्याने बदल करत आहे
Twitter Stock Trading
Twitter Stock TradingSakal

Twitter Stock Trading: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कने अलीकडेच ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे रीब्रँड केले आहे. आता या प्लॅटफॉर्मला एक्स असे नाव देण्यात आले आहे. ट्विटरचा पारंपारिक लोगो देखील बदलला आहे.

मस्कला X हे एव्हरीथिंग अॅप/प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करायचे आहे, म्हणून Twitter चे रीब्रँडिंग केले आहे. आता X प्लॅटफॉर्मवर शेअर ट्रेडिंग देखील सुरु करता येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

ट्रेडिंग हब सुरू झाल्याची बातमी

याविषयीची माहिती Semafor ने एक दिवस आधी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी दिली होती. X प्लॅटफॉर्मखाली लवकरच ट्रेडिंग हब सुरू होऊ शकेल, असा दावा यात करण्यात आला आहे.

या प्रकरणाशी संबंधित सूत्रांचा हवाला देत Semafor यांनी सांगितले की, इलॉन मस्क यांना X हे आर्थिक डेटा पॉवरहाऊस बनवायचे आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

Twitter Stock Trading
Sahara Refund: CRCS सहारा रिफंड पोर्टलवर दावा करण्याची शेवटची तारीख कोणती, कधी मिळतील पैसे?

अहवालात कोणते दावे करण्यात आले आहेत?

रिपोर्टनुसार, एक्सने यासाठी इंडस्ट्रीतील अनेक लोकांशी संपर्क साधला. एक्स सर्वसमावेशक आर्थिक कंटेंट, रिअल टाइम स्टॉक फीड आणि अनेक सेवा देण्याची योजना आखत आहे. यासाठी X ने गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक सेवा पुरवठादारांशी संपर्क साधला आहे.

इलॉन मस्कने दावा नाकारला

शेअर बाजार, क्रिप्टो मार्केट आणि ऑप्शन्स ट्रेडिंगशी संबंधित बातम्या शेअर करणार्‍या @unusual_whales या हँडलने XNews Daily वर अहवाल शेअर केला, ज्याच्या उत्तरात इलॉन मस्कने हा दावा नाकारला आहे. इलॉन मस्कने ट्रेडिंग हब सुरू करण्याच्या वृत्ताला उत्तर देताना लिहिले की, त्यांच्या माहितीनुसार, या संदर्भात कोणतेही काम केले जात नाही.

Twitter Stock Trading
Supreme Court: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, जामीन अर्जावर विचार करण्यास दिला नकार

इलॉन मस्कने ट्विटरमध्ये केले अनेक बदल

ट्विटर विकत घेतल्यानंतर इलॉन मस्क त्यात सातत्याने बदल करत आहेत. त्यानी ब्लू सबस्क्रिप्शन नावाची सशुल्क सेवा सुरू केली आहे. ब्लू सबस्क्रिप्शन ग्राहकांना X प्लॅटफॉर्मवर अनेक अतिरिक्त सुविधा दिल्या जात आहेत.

त्याआधी, इलॉन मस्कने ट्विटरला फायदेशीर बनवण्यासाठी विविध खर्चात कपात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com