millionaire husband of Dubai: 
ग्लोबल

Viral Video: बाळ जन्मल्यानंतर पत्नीने दुबईच्या 'आमिर' पतीला काय गिफ्ट मागितलं? व्हिडिओ पाहाच

millionaire husband of Dubai: काही दिवसांपूर्वी या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर महिलेने आपल्या पतीकडे मोठं गिफ्ट मागितलं आहे.

कार्तिक पुजारी

Women Demands From Millionaire Husband: दुबईच्या एका महिलेने आपल्या श्रीमंत पतीकडे जी मागणी केली आहे ती ऐकून लोक तोंडात बोट घालून घेत आहेत. एक महिला आपली हाय-फाय लाईफ स्टाईल सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी या महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर महिलेने आपल्या पतीकडे मोठं गिफ्ट मागितलं आहे. तिची मागणी ऐकूनच सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

महिलेने पतीकडे काय मागणी केली?

महिलेने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर महिला चर्चेत आली आहे. महिलेने एक व्हिडिओ शेअर केला असून तिने बाळाच्या जन्माबाबत माहिती दिली आहे. तसेच बाळाच्या जन्मानंतर आपल्या श्रीमंत पतीकडे काय-काय मागणी केली आहे याची माहिती महिलेने दिली आहे. महिलेने आपल्या पतीकडे एक भव्य याट, २० खोल्यांचा एका मोठा बंगला मागितला आहे. (Viral Video gift wife ask the billionaire husband of Dubai after the birth of the baby)

दुबईतील सर्वात मोठ्या इमारतीवर म्हणजे बुर्ज अल अरबवर बाळाच्या नावाची घोषणा, अमेरिकेच्या प्रख्यात सर्जनकडून १, ५०,००० डॉलरच्या ममीचे मेकओवर यासह महिनेने आणखी खूप काही मागण्या केल्या आहेत. soudiofarabia या इन्स्टाग्रामवर पेजवरुन महिलेने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याआधीही महिलेने अशाच प्रकारचे काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. माहितीनुसार, महिलेचा पती दुबईचा श्रीमंत व्यक्ती आहे. सोशल मीडियावर या जोडप्याची चर्चा होत आहे.

महिला होतेय ट्रोल

महिलेच्या या मागणीनंतर लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी ही खूप फालतू गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. रुढीवादी पंरपरेला ही चालना देणारी गोष्ट आहे. काहींनी या महिलेला गोल्ड डिगर म्हटलं आहे. माहितीनुसार, महिला सहा वर्षाची असताना आपल्या आई-वडिलांसोबत दुबईमध्ये आली होती. आठ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना तिची ओळख जमाल अल नदक याच्याशी झाली. आज तो तिचा पती आहे. त्यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT