Japan Rocket Explodes : टेक ऑफनंतर काही सेंकदातचं उडाल्या ठिकऱ्या! जपानच्या पहिल्या प्रायव्हेट रॉकेटचा Video Viral

Japan First Private Sector Rocket Explodes : जपानच्या एका खासगी कंपनीचा अंतराळात रॉकेट पाठवण्यात प्रयत्न फसला आहे.
Japan First Private Sector Rocket Explodes
Japan First Private Sector Rocket Explodes Esakal

Japan First Private Sector Rocket Explodes : जपानच्या एका खासगी कंपनीचा अंतराळात रॉकेट पाठवण्यात प्रयत्न फसला आहे. एका खासगी कंपनीच्या रॉकेटचा लाँच केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच हवेत स्फोट झाला. या स्फोटाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

जपानचं खासगी क्षेत्रातील पहिलं रॉकेट टेक ऑफ केल्यानंतर काही क्षणातच कोसळलं आहे. एका खासगी कंपनीच्या वतीनं या पहिल्या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. मात्र रॉकेटचं प्रक्षेपण केल्यानंतर त्याचा लगेच स्फोट झाला.

या स्फोटानंतर परिसरात धूराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. यानंतर येथे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी तेथे पाणी टाकण्यात आल्याचं देखील पाहायला मिळाले. हे रॉकेट टोकिओ मधील स्टार्ट-अप कंपनी 'स्पेस वन'चं होतं. मात्र कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.

Japan First Private Sector Rocket Explodes
Sharad Pawar : शरद पवारांनी ईडीला उघडं पाडलं, थेट आकडेवारी सांगत केली पोलखोल! 

स्पेस वन कंपनी जर या रॉकेटच्या माध्यमातून सॅटेलाईट यशस्वीरित्या अंतराळात पाठवू शकली असती तर ती ही कामगिरी करणारी पहिली खाजगी जपानी कंपनी ठरली असती. मात्र त्यांचं हे ध्येय पूर्ण होऊ शकले नाही. या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जपानी मीडियानुसार, या रॉकेटच्या प्रक्षपणाला अनेकदा टाळण्यात आले होते.

Japan First Private Sector Rocket Explodes
Lok Sabha 2024: लोकसभेपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का बसणार? संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com