Volodymyr Zelensky Volodymyr Zelensky)
ग्लोबल

झेलेन्स्कीचे मोठे विधान; आम्ही नाटोमध्ये सहभागी होणार नाही

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज २१ वा दिवस आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी अनेक प्रसंगी म्हटले आहे की, युक्रेनने नाटोमध्ये सामील होणे त्यांना आवडत नाही. ज्यामुळे रशियाचे सार्वभौमत्व कमी होते. आता युक्रेनला आपत्तीचा सामना करावा लागत आहे. अशात युक्रेनियन लोकांना हे समजून घेणे आवश्यक आहे की ते नाटोमध्ये सामील होणार नाहीत, असे विधान अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी केले आहे.

रशियन (russia) सैन्य हळूहळू युक्रेनच्या भूमीवर कहर करीत आहे. रशियन सैन्य राजधानी किव्हसह अनेक शहरे ताब्यात घेण्यासाठी धडपडत आहे. मात्र, युक्रेनचे सैन्य रशियन सैन्याच्या विरोधात ठामपणे उभे आहे. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सैन्याचेही मोठे नुकसान झाले. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो आणि पाश्चात्य देशांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

रशियन (russia) मीडिया स्पुतनिकनुसार, झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की, युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही. नाटो आणि पाश्चात्य देशांवर नाराज असलेले झेलेन्स्की आता नाटोमध्ये सामील होणार नाहीत. यापूर्वी झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) म्हणाले की, युक्रेनसोबतच्या लढाईत आता १३,००० हून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रशियाची अनेक अत्याधुनिक शस्त्रेही नष्ट करण्यात आली आहेत.

कॅनडाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या युक्रेनवरील (ukraine) हल्ल्याला सहकार्य करणाऱ्या १५ रशियन अधिकाऱ्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. मॉस्कोवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. पुतिन यांनी त्यांचा बेकायदेशीर हल्ला सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन नेतृत्वाने आपली भूमिका बदलली नाही तर कॅनडा पुढील कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जॉली यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT