बाळाला स्तनपान करताना दुधाचा रंग झाला गुलाबी 
ग्लोबल

Viral Video: बाळाला स्तनपान करताना दुधाचा रंग झाला गुलाबी

बाळाला स्तनपान करत असताना दुधाचा रंग बदलून गुलाबी होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले.

सकाळ डिजिटल टीम

गाईच्या दुधाला आईच्या दुधाची सर येत नाही, असं म्हणतात. आईचं दुध तिच्या बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून बाळाच्या जन्मानंतर त्याला स्तनपान करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

दुधाचा रंग पांढरा असतो, हे आपण जाणतो, परंतु दुधाचा रंग गुलाबी असल्याचे तुम्ही कधी ऐकलंय का? एका महिलेने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल.

''जो जॉन्सन ओव्हरबी' नावाच्या या महिलेने काहीच दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला. इतर मातांप्रमाणे तीही नियमितपणे बाळाला स्तनपान करत होती. साधारणपणे सहा आठवड्यानंतर बाळाला दुध पाजताना दुधाचा रंग काहीसा बदलल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या दुधाचा रंग बदलून गुलाबी होत असल्याचे तिने पाहिले. त्यामुळे ती घाबरून गेली.या महिलेने याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये ही महिला दुधाच्या दोन पिशव्या दाखवते. एका पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचं तर दुसऱ्या पिशवीत गुलाबी रंगाचे दूध दिसतं. ‘ जेव्हा मी आई होईन आणि बाळाला स्तनपान करताना माझे दूध रंगेबीरंगी येईल, असे मला कोणी सांगितले असते, तर मला विश्वासही बसला नसता’, असे या पोस्टमध्ये महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, दुधाचा रंग गुलाबी कसा झाला? याबाबत अनेकांनी तिला प्रश्न विचारला. या प्रश्नावर महिलेने काही उत्तर दिले नाही. अनेक युजर्सनी यावर विविध प्रतिक्रीया नोंदवल्या. दुधाचा रंग गुलाबी असला तरीही ती महिला बाळाला स्तनपान करू शकते असेही काहींनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT