lama, China, Tibet 
ग्लोबल

कोण आहेत पंचेन लामा? चीनने त्यांच्यासोबत काय केलं?

सकाळ डिजिटल टीम

ल्हासा: तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी 11 वे पंचेन लामा (11th Panchen Lama) यांचा अवतार ज्या नावाला मान्यता दिली ते नाव म्हणजे गेधुन चोएक्यी नीमा. मागील 25 वर्षांपासून ते नेमके कुठे आहेत? याची कोणालाही काहीच कल्पना नाही. 14 मे 1995 मध्ये नोबेल शांती पुरस्कार विजेते तिबेट धर्मगुरु दलाई लामा यांनी सहा वर्षीय गेधुन चोएक्यी नीमा यांना पंचेन लामा असे संबोधत बौद्ध अवतार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर चीनकडून त्यांचे अपहरण करण्यात आले. आता पंचवीस वर्षानंतर चीनच्या या भूमिकेवर अमेरिकेने आक्षेप नोंदवला असून पंचेन लामा यांची सुटका करण्याची विनंती केली आहे. जाणून घेऊयात नेमके हे प्रकरण आहे तरी काय... 

तिबेटचे प्रसिद्ध धर्म गुरु दलाई लामा यांच्या प्रमाणेच पंचेन लामा यांना भगवान गौतम बुद्ध यांचाच एक अवतार मानले जाते. दलाई लामा यांना अवलोकीतेश्वर स्वरुपातील अवतार तर पंचेन लामा यांना अमिताभ अवतार स्वरुपात मानाचे स्थान दिले जाते. दलाई लामा आणि पंचेम लामा यांच्यातील वयाचे अंतर जवळपास 50 वर्ष आहे. त्यामुळे दलाई लामांचा अवतार हे पंचेन लामा ठरवतील असे बोलले जाते. मात्र पंचेन लामा नेमके कुठे आहेत हे कोणालाही माहित नाही. 

कोण आहेत पंचेम लामा?

14 मे 1995 मध्ये तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांनी गेधुन चोएक्यी नीमा यांना 11 वे धर्मगुरु म्हणून घोषीत केले. 17 मे 1995 मध्ये 6 वर्षीय गेधुन चोएक्यी नीमा  कुटुंबियांसह रहस्यमयरित्या गायब झाले. 28 मे 1996 पर्यंत या अपहरणामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. संयुक्त राष्ट्राच्या बाल हक्क कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा मुद्दा उचलल्यानंतर चीनने पंचम लामा यांना कैद केल्याचे समोर आले होते. दलाई लामा यांनी पंचेम लामा यांना धर्मगुरु घोषीत केल्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आमाल्हाला लष्कराला पाठवावे लागले, असे चीनने म्हटले होते. दरम्यान 29 नोव्हेंबर 1995 मध्ये चीनने ग्लालसन नोरबू यांना पंचेन लामा घोषीत केले होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST workers DA: एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ; वेतन, पेन्शनवरही चर्चा, प्रताप सरनाईकांची घोषणा

Women's T20 World Cup 2026: १२ संघ, २४ दिवस अन् ३३ सामन्यांचा थरार; भारताचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता? जाणून घ्या सर्वकाही

Farmers Protest March: उद्योगपतींची कर्जे सरसकट माफ; मग शेतकऱ्यांवर कर्जमाफीच्या अटींचे ओझे का?

Latest Marathi News Live Update : परिवर्तन आघाडीच्या नगरसेवकांची बावनकुळे यांनी घेतली भेट, राजकीय चर्चांना वेग

Anvay Dravid In India U19 Team : राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड! श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI ची घोषणा, संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT