esakal | मल्ल्याची शेवटची याचिकाही ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली; महिनाभरात भारताच्या ताब्यात?
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay-Mallya

मल्ल्या किंगफिशर एअरलाईन्स या विमान कंपनीचा मुख्य प्रवर्तक आहे. तसेच ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोपही त्याच्यावर आहेत.

मल्ल्याची शेवटची याचिकाही ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली; महिनाभरात भारताच्या ताब्यात?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : फरार भारतीय उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटन हायकोर्टाने जोरदार झटका दिला आहे. भारताच्या हवाली करण्यास विरोध करणारी याचिका मल्ल्याने ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ती याचिका ब्रिटन हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यामुळे मल्ल्याकडे आता कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक राहिला नसल्याने पुढील २८ दिवसांमध्ये मल्ल्याला भारताच्या हवाली करण्यात येईल, असे ब्रिटनमधील माध्यमांचे म्हणणे आहे. 

फरार उद्योगपती मल्ल्याला भारताच्या हवाली करण्यासाठी ब्रिटनच्या गृहसचिव असलेल्या प्रीती पटेल यांना प्रत्यार्पणासाठी पाठविलेल्या कोर्टाच्या आदेशास पुढील २८ दिवसांत औपचारिकरित्या मान्यता द्यावी लागेल. पटेल यांच्या मान्यतेनंतरच ब्रिटन सरकार मल्ल्याला भारत सरकारच्या ताब्यात देण्याच्या हालचाली करेल. गेल्या महिन्यातही मल्ल्याने अशीच याचिका दाखल केली होती. तेव्हाही ब्रिटन हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती. 

Coronavirus : अमेरिकेत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा; काय आहे प्रकरण?

दरम्यान, बँक कर्ज परतफेडीचा प्रस्ताव बिनशर्त स्वीकारण्याचा आणि त्याच्यावरील खटला बंद करण्याचे आवाहन मल्ल्याने भारत सरकारला केले होते. तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत भारत सरकारचे अभिनंदनही केले होते. मात्र, मी कर्जाचे देय देण्यासाठी तयार असतानाही त्या प्रस्तावाकडे सरकारने वारंवार दुर्लक्ष केल्याचे मल्ल्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.    

- पाकच्या क्रिकेटपटूने मंदिरात जाऊन केली मदत...

मल्ल्याने आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कोविड-१९ स्पेशल पॅकेजबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकारला वाटेल तेवढ्या नोटा ते छापू शकतात. सरकारी मालकीच्या बँकांमधून घेतलेले कर्ज १०० टक्के परतफेड करण्यासाठी जो तयार आहे, अशा माझ्यासारख्या छोट्या देयकाकडे सरकारने दुर्लक्ष करायला हवे.' 

मल्ल्याने जामीनासाठी ६ लाख ५० हजार पाउंड एवढी रक्कम मोजली असून तो १७ एप्रिल पासून जामीनावर बाहेर फिरत आहे. पुढील २८ दिवसांत मल्ल्याला भारतात पाठविले जाईल, अशी आशा सीबीआय आणि ईडी या दोन्ही संस्थांना आहे. 

- कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही : जागतिक आरोग्य संघटना

मल्ल्या किंगफिशर एअरलाईन्स या विमान कंपनीचा मुख्य प्रवर्तक आहे. तसेच ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोपही त्याच्यावर आहेत. विनाअट माझ्याकडून पैसे घ्या आणि हे प्रकरण बंद करा, असे मल्ल्याने म्हटले आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनुसार २० एप्रिल २०१७ ला युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांनी मल्ल्याला अटक केली होती. भारताच्या हवाली करण्याच्या लंडन हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात मल्ल्याने ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

loading image