Corona Vaccine Sakal
health-fitness-wellness

Booster Dose: काय असतो बूस्टर डोस? तो कधी द्यावा लागतो?

विनायक होगाडे

नवी दिल्ली : सध्या देशात आणि जगभरात कोरोना संकटाने धुमाकूळ माजवलंय. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट सध्या या थैमानासाठी जबाबदार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आल्याचंही म्हटलं गेलंय. आता कोरोनाचे नवनवे व्हेरियंट्स समोर येत आहेत. यामध्ये डेल्टा प्लस, लॅम्बडा आमि कप्पा व्हेरियंट यांसारखे नवनवे व्हेरियंट्स जगभरात आढळून येत आहेत. कोरोना व्हायरस सतत आपलं स्वरुप बदलत असल्याने कोरोनावरील लस बनवणाऱ्या कंपन्या देखील याबाबत सतर्क झाल्या आहेत. कारण व्हायरसच्या या बदललेल्या स्वरुपावर बनवलेली लस कितपत प्रभावी ठरेल, याची तपासणी सध्या सुरु आहे.

नव्या व्हेरियंट्सशी लढा देण्यासाठी बूस्टर डोस

लसनिर्मिती करणाऱ्या काही कंपन्यांचं म्हणणं आहे की, त्यांची लस कोरोनाच्या सर्व प्रकारच्या व्हेरियंट्सवर प्रभावी आहे. तर काही कंपन्यांना आढळून आलंय की, काळानुसार त्यांच्या लशीचा प्रभाव कमी झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर लस निर्माण करणाऱ्या कंपन्या बूस्टर डोस हा एक पर्याय पुढे आणत आहेत. यासाठी त्यांनी नियामक अधिकाऱ्यांकडे परवानगीची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. संयुक्त अरब अमीरात, थायलंड आणि बहरीनसारखे देश ज्यांनी आपल्या लोकांना ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेकाचा डोस दिला आहे, त्या देशांनी देखील लशीचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.

हिवाळ्याआधी बूस्टर डोस देणार ब्रिटन

ब्रिटनने फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि एस्ट्राझेनेकाच्या लशींना मंजूरी दिली आहे. ते हिवाळ्याआधी 50 वर्षे वयाच्या वरील लोकांना बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहेत. बूस्टर डोसची मागणी वाढूनही अमेरिकेच्या नियामक अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, देशात सध्या तरी याप्रकारचा बूस्टर डोस देण्याची गरज नाहीये. अमेरिकेचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी एँथनी फौची यांनी म्हटलंय की, अजूनही असा काहीही डेटा उपलब्ध नाहीये की ज्या आधारावर बूस्टर डोसची गरज असल्याचं सिद्ध होईल.

बूस्टर डोस म्हणजे काय?

एखाद्या विशिष्ट बॅक्टेरिया अथवा व्हायरसविरोधात लढण्यासाठी शरीरात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसची गरज असते. हा बूस्टर डोस त्याच लशीचा असू शकतो जी लस आधीच एखाद्या व्यक्तीने घेतली आहे. बूस्टर डोस शरीरात अधिक एँटीबॉडीज निर्माण करत प्रतिकार शक्तीमध्ये वाढ करतो.

बूस्टर डोस कुणाला घेता येतो?

ज्यांनी आपल्या लशीचे पूर्ण डोस घेतले आहेत, त्यांनाच हा बूस्टर घेता येतो. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट्स सातत्याने समोर येत असल्याने जगभरातील आरोग्य संस्था बूस्टर डोस देण्याआधी अनेक गोष्टींबाबत विचार करतील. सर्वांत आधी हा बूस्टर डोस ज्येष्ठ व्यक्तींना देण्याबाबतच विचार केला जाऊ शकतो. अथवा असे लोक ज्यांच्या शरीरात अधिक प्रमाणात अँटीबॉडीज तयार झालेल्या नाहीयेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT