esakal | "PM मोदींच्या हट्टामुळे शेतकऱ्याला रस्त्यावर बसावं लागलं"
sakal

बोलून बातमी शोधा

NARENDRA MODI

काँग्रेसची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जून खरगे आदि नेते उपस्थित होते. खरगे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.

"PM मोदींच्या हट्टामुळे शेतकऱ्याला रस्त्यावर बसावं लागलं"

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- काँग्रेसची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जून खरगे आदि नेते उपस्थित होते. खरगे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. अनेकांना बेरोजगार व्हावं लागलं आहे. गरीब लोकांना एकवेळचे खाणेही मिळतंय नाही. कोरोनाचे संकट असताना महागाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. मोदी म्हणायचे सुख समृद्धीने देशाला पुढे नेलं जाईल. यासाठी त्यांनी लोकांकडे मतं मागितलं. भाषणामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, काँग्रेसला तुम्ही 70 वर्षे दिले. मला फक्त 5 वर्ष द्या. पण, आज ते सत्तेत आल्यास काय परिस्थिती आहे. लोकांनी स्थिती वाईट झाली आहे, असं खरगे म्हणाले.

मोदींच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. इंधनाचे दर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. ट्रायबल भागात 107-108 रुपयांना पेट्रोल मिळत आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीची तुलना करता आताचे दर कमी आहेत. तरीही इंधनाचे दर जास्त ठेवण्यात आले आहेत. ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना पेट्रोल लागते. त्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. खतांवरील जीएसटी वाढवण्यात आली आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली.

हेही वाचा: शिवसेना,राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली - नाना पटोले

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना आणल्या जाणार होत्या, पण आज शेतकरी दिल्लीत रस्त्यावर बसला आहे. त्यांना उठवण्याचा प्रयत्न सरकार करत नाही. त्यांच्यासाठी हानीकारण ठरणारे कायदे रद्द करण्यास सरकार तयार नाहीत. कायद्यात काय कमी आहे ते सांगा असं भाजप म्हणतं. आम्ही संसदेत दुरुस्त्या सांगितल्या, पण ते बदलण्यास तयार नाहीत. जिवनाश्यक वस्तू कायदा काळा बाजार रोखण्यासाठी आणण्यात आला होता. पण, आज श्रीमंत किंवा व्यापारी कितीही प्रमाणात धान्याची साठवणूक करु शकतात. आवश्यक वस्तूंवर नियंत्रण असल्यास सामान्यांचा दिलासा मिळतो, असंही मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

loading image