health tips 
health-fitness-wellness

Skin Care Tips: संत्र्यापासून बनवलेल्या घरगुती फेस पॅकमूळे उजळू शकते तमची त्वचा!

सकाळ ऑनलाईन टीम

सध्या सर्वांना काळजी असते ती म्हणजे त्वचा कशी मुलायम राहील याची. आज  यासाठीच आपण एका घरगुती उपयाबद्दल जाणून घेणार आहोत. संत्री जसे शरीरासाठी उपयुक्त असतात तसेच त्याच्या सालीचाही मोठा उपयोग होतो. संत्र्याच्या सालीपासून आपण एक घरगुती फेस पॅक बनवू शकतो. हा लेप त्वचेवर लावल्यावर तुमची त्वचा चांगली मुलायम पडेल. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील गडद डाग, ब्लॅकहेड्स, फोडी कमी होण्यासही मदत होते. हा लेप व्हिटॅमिन सी (Vitamin C) ने समृद्ध असून ते त्वचा स्वच्छ करण्यासही मदत करते. तसेच  त्यात चेहऱ्यावरील मुरुम कमी करणारे आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील आहेत. आपण काही सोप्या टिप्स आणि घटकांसह आपला चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवू शकता. चला तर मग संत्राच्या सालाचा फेस पॅक कसा बनवायचा त्याची कृती आपण पाहूया. फेस पॅक बनवण्यासाठी पहिल्यांदा 2-3 संत्री घ्या. त्यानंतर त्यांची साल काढून एक आठवढाभर त्याला वाळवून घ्यावे. त्यानंतर त्या सालींची बारीक पूड करून घ्यावी. 

_फेस पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य; 
एक चमचा तांदळाची पूड, एक चमचा तयार केलेली संत्र्याची पूड, संत्र्याचा ज्यूस, दूध

- फेस पॅक तयार कसा करायचा 
संत्र्याच्या सालीपासून घरगुती फेस पॅक बनवण्यासाठी पहिल्यांदा एका बाऊलमध्ये एक चमचा तांदळाची पूड आणि एक चमचा आपण तयार केलेली संत्र्याची पूड एकत्र घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये संत्र्याचा ज्यूस ओतावा. जर संत्र्याचा ज्यूस उपलब्ध नसेल, तर लिंबाचा ज्यूस ओतला तरी चालेल. यानंतर त्यात मिश्रण  फेस पॅक बनण्याजोगे दूध घालावे आणि ते मिश्रण करून घ्यावे. 

तयार झालेले मिश्रण नंतर त्वचेवर लाऊन घ्यावे. मिश्रण लावल्यावर त्याला 2 तास वाळू द्यावे. हा लेप वाळल्यानंतर तो धूवून घ्यावे. यामूळे आपली त्वचा मुलायम पडेल. जर अशा पध्दतीने हा फेस पॅक तयार करून आठवड्यातून 2-3 वेळेस  लावला तर तूमची त्वचा चांगली उजळू शकते. हा लेप त्वचेवर लावल्यावर तुमची त्वचा चांगली मुलायम पडेल. याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरील गडद डाग, ब्लॅकहेड्स, फोडी कमी होण्यासही मदत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Accident : आईसोबत गजानन महाराजांच्या आरतीला गेलेल्या ७ वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा अज्ञात क्रूझर वाहनाने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Video: गार्गीला वाचवण्यासाठी गौतमी पाटीलची साद; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, 'तिला मदत करा'

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT