health-fitness-wellness

पावसाळ्यात घ्या ‘लेप्टो’ची खबरदारी

साचलेल्या दूषित पाण्यामुळे वाढतो धोका; डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यासह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जागोजागी पावसाचे पाणी साचले आहे. अशा दूषित पाण्यामध्ये गेल्यामुळे ‘लेप्टोस्पायरोसिस’ या जीवाणूजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

जनावरांत आढळणाऱ्या ‘लेप्टोस्पायरा’ या रोगजंतूमुळे हा आजार होतो. उंदीर, घुशी आदी प्राण्यांच्या अंगावर असलेले हे रोगजंतू पावसात पाण्याबरोबर वाहून येतात. अशा दूषित पाण्याच्या डबक्यात गेल्यावर या आजाराची शक्यता निर्माण होते. प्रामुख्याने पाळीव प्राणी तसेच शेतात काम करणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता जास्त असते. भात शेती करणारे शेतमजूर तसेच कत्तलखान्यातील कामगार, मासेमार व्यक्तींमध्ये या रोगाचे विशेष लक्षणे किंवा लागण होते. तसेच शहरात झोपडपट्टी परिसरातील किंवा सखल भागात साचलेल्या पाण्याशी संपर्क आल्यास या आजाराचा धोका संभवतो. आजाराची तीव्रता वाढल्यास मूत्रपिंडाचे आणि यकृताचे काम बंद पडून मृत्यू ही ओढवू शकतो.

काय आहे लेप्टोस्पायरोसिस

लेप्टोस्पायरोसिस हा प्रामुख्याने जनावरांत आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरा या जीवाणूंच्या २३ प्रजाती आहेत. लेप्टोस्पायरोसिस आजार विशिष्ट हंगामामध्ये प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला आणि शेवटी काही प्रमाणात या आजाराचे रुग्ण दिसून येतात.

असा होतो संसर्ग

बाधित प्राण्यांच्या मुत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचे प्रमुख स्रोत आहे. संसर्ग झालेल्या जनावरांच्या मूत्र, रक्ताचा प्रत्यक्ष संपर्क आल्याने या आजाराचा प्रसार होतो. शरीरावरील जखम अथवा नाक डोळे यांच्यामार्फत जंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात.

लक्षणे

- तीव्र ताप

- डोकेदुखी, स्नायू दुखी

- थंडी वाजणे

- डोळे सुजणे

- रक्तातील प्लेटलेट्स कमी होणे

काय काळजी घ्याल..

- पावसाळी पाण्याच्या साचलेल्या डबक्यात जाऊ नये

- दूषित पाणी, माती किंवा भाज्यांचे मानवी संपर्क टाळणे

- संपर्क येऊ नये यासाठी पदवेश, हातमोजे वापरावेत

- प्राण्यांच्या मूत्रामुळे पाण्याचेसाठे दूषित होऊ नये यासाठी काळजी घेणे

- पावसात भिजून आल्यास हात, पाय स्वच्छ साबणाने धुवा

''गेल्या काही दिवसांच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साचले आहे. अशा दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असून, असा संशयित रूग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळवावे.''

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, महापलिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM Resigns : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; DK शिवकुमार होणार नवे CM, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय

प्राजक्ता माळीने कान्सच्या रेड कार्पेटवर नेसलेली साडी कुठली आहे ठाऊक आहे? ठाण्यासोबत आहे खास कनेक्शन

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

Kerala Monsoon Update : माॅन्सूनचा केरळात पोहोचण्याचा मुहूर्त हुकला, महाराष्ट्रात कधी येणार? पुढील 2-3 दिवस काही भागात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT