esakal | पुण्यातून सुरत, बडोद्यासाठी रोज एसटी बस सुटणार
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातून सुरत, बडोद्यासाठी रोज एसटी बस सुटणार

पुण्यातून सुरत, बडोद्यासाठी रोज एसटी बस सुटणार

sakal_logo
By
सकाळा वृत्तसेवा

पुणे : सुरत आणि बडोद्यासाठी एसटी महामंडळाने वाकडेवाडी स्थानकावरून दररोज बससेवा सुरू केली आहे. या बससाठी ई-पासची आवश्यकता नसून १०० टक्के प्रवासी क्षमतेने बस सोडण्यात येणार आहेत.

वाकडेवाडी स्थानकातून सुरतसाठी दररोज सकाळी ८ वाजता बस सुटेल. ही बस निमआराम असून प्रौढांसाठी ६५४ रुपये तर, मुलांसाठी ३२५ रुपये तिकिट असेल. याच स्थानकातून बडोद्यासाठी दररोज सायंकाळी ६ वाजता बस सुटेल. प्रौढांसाठी ६६५ रुपये तर, मुलांसाठी ३३५ रुपये तिकिट असेल, असे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सांगितले. मास्कचा वापर करणाऱ्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, असेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top