Diabetes Patient Health Care esakal
आरोग्य

Diabetes Patient Health Care: मधुमेहाच्या रुग्णांनी चप्पल बूट खरेदी करतानासुद्धा घ्यावी ही विशेष काळजी

मधुमेहाचे रूग्ण गोड पदार्थ खाताना जशी काळजी घेतात तशीच काळजी त्यांनी त्यांचे चप्पल बूट घेतानाही घेतल्यास तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल

सकाळ ऑनलाईन टीम

मधुमेहाच्या आजाराने एकदा तुम्हाला वेढले की त्यातून तुमची सुटका नाही. मात्र योग्य काळजी तुमचा वाढता त्रास आटोक्यात आणण्यास तुमची मदत करू शकते. मधुमेहाचे रूग्ण गोड पदार्थ खाताना जशी काळजी घेतात तशीच काळजी त्यांनी त्यांचे चप्पल बूट घेतानाही घेतल्यास तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल.

मधुमेहाच्या रूग्णांना असतात पायाच्या या समस्या

जेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण कमी- जास्त होऊ लागतं, तेव्हा त्याचा परिणाम शरीरातील पेशींवर होण्यास सुरुवात होते. ज्यामुळं पायांच्या समस्या भेडसावू लागतात. मधुमेह असणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये पायाला इजा होणं, तळव्यांची त्वचा रुक्ष होणं अशा समस्या जाणवू लागतात. जखम झाल्यास ती भरण्यासही जास्त वेळ जातो. यासाठीच पाय सुरक्षित ठेवण्यासाठी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी योग्य चप्पल आणि बूट निवडणं हा फायद्याचा पर्याय ठरतो.

  • चप्पल बूट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • चुकूनही घट्ट किंवा ताणणाऱ्या चप्पल निवडू नये. त्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन निट होत नाही.

  • नवी चप्पल घ्यायला जाताना पायात घातल्यानंतर तुमचे पाय अकडत तर नाहीये किंवा तुम्हाला ताणल्यासारखं तर वाटत नाहीये याची पूरेपूर काळजी घ्या. (Health)

  • शू बाईट किंवा तत्त्सम इजा होणार नाहीत यासाठी धारदार काठ असलेल्या, अती उंच, खरखरीत कापडाच्या चपला निवडू नका.

  • मधुमेह असणाऱ्यांनी चुकूनही उंट टाचांच्या चपला निवडू नका. उंच टाचांमुळे पायांवर ताण येतो.

  • मधुमेहींनी कायमच तळव्याच्या भागात मऊ असणाऱ्या आणि वजनानं हलक्या असणाऱ्या चपला- बूट निवडावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

सरकारी जमिनींवर आता शेती करता येणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; पण फक्त एकाच अटीवर, कोणती?

SRH vs RR PL 2026: १६ चेंडूंत फिफ्टी! वैभव सूर्यवंशीने मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरला आयपीएल इतिहासातील Baby Boss

Maharashtra SET Exam : महाराष्ट्र-गोव्यातील सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी SET परीक्षा २६ जुलैला; अर्ज प्रक्रिया २ जूनपासून ऑनलाइन सुरू

TET Exam: टीईटी परीक्षेसाठी कमी संख्या असलेल्या माध्यमाच्या उमेदवारांची परीक्षा केंद्र निश्चित

SCROLL FOR NEXT