Buttermilk  esakal
आरोग्य

Buttermilk : ताकात चुकूनही मीठ घालू नका, पोटासाठी नुकसानदायी; त्याऐवजी घाला हे पदार्थ

बहुतेक लोकांना मीठ मिसळलेले ताक पिणे आवडते, परंतु ही एक मोठी चूक ठरू शकते.

साक्षी राऊत

Buttermilk : उन्हाळा आला की जेवणात आणि असेही ताक घेण्याचे प्रमाण वाढते. ताक पिण्यासही थंड असते आणि शरीरासाठी आतूनही थंड असते. त्यामुळे बहुतांश लोक उन्हाळ्यात ताक पितात. मात्र घरी ताक बनवताना तुम्हीही त्यात मीठ घालता का? तुम्ही असे करत असाल तर वेळीच थांबा.

उन्हाळ्यात ताक पिण्याचा आनंद वेगळाच असतो. हे पेय पोटासाठी खूप फायदेशीर आहे, तसेच आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम देते. भारतात अनेक ठिकाणी याला मठ्ठा असेही म्हणतात. बहुतेक लोकांना मीठ मिसळलेले ताक पिणे आवडते, परंतु ही एक मोठी चूक ठरू शकते.

ताक पिण्याचे फायदे

हे पेय दह्यापासून बनवले जाते. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, रिबोफ्लेविन आणि प्रोबायोटिक्स असतात. ताक पिल्याने एनर्जी मिळते, तसेच पोटाच्या समस्या दूर होतात. ताक पिल्याने हाडेही मजबूत होतात.

पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांच्या मते, मीठ मिसळून ताक पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याचा वाईट परिणाम थेट पोटावर होतो. त्यामुळे मीठाऐवजी ताक इतर गोष्टींमध्ये मिसळून प्यावे.

ताकात हेल्दी बॅक्टेरिया असतात. जे नियंत्रित मात्रेत शरीराला फायदेशीर ठरतात. मात ताकात मीठ घातल्याने त्याचा परिणाम कमी कमी होऊ लागतो. त्याला प्रोबायोटिक्स असेही म्हणतात. त्यामुळे ताकात मीठ घातल्याने प्रोबायोटिक्सचा प्रभाव कमी कमी होऊ लागतो. (Summer)

पोषणतज्ञांच्या मते, ताकात मीठ घातल्याने हेल्दी बॅक्टेरियामध्ये धोकादायक वातावरण निर्णाण होते. ज्यामुळे प्रोबायोटिक्स निकामी होतात. यामुळे तुमचे बॉडी सेल्सही निकामी होऊ शकतात. (Health)

मीठाऐवजी ताकात हे पदार्थ मिक्स करून प्या

जीऱ्याची पूड

पुदिन्याच्या पानांचं पावडर

धणे पावडर

डिस्क्लेमर - वरील लेख सामान्य माहितीवर आधारलेला असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT