Body Posture esakal
आरोग्य

Body Posture : योग्य बॉडी पॉश्चरमध्ये राहण्याचे ७ मोठे फायदे, बसण्याच्या पद्धतीत वेळीच करा योग्य बदल

वाकून चालण्याचा परिणाम फक्त तुमच्या पोश्चरवरच होत नाही तर ही सवय अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण देते

साक्षी राऊत

Body Posture : कोरोनाच्या काळात अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम मिळाले. घरून काम करणे अगदी सोयीस्कर वाटत असले तरी या काळात अनेकांना पाठीच्या दुखण्याचे त्रास सुरु झालेत. वाकून चालण्याचा परिणाम फक्त तुमच्या पोश्चरवरच होत नाही तर ही सवय अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण देते. तेव्हा बसण्याची योग्य पद्धत माहिती असणे फार गरजेचे आहे.

बॉडी पॉश्चर योग्य ठेवण्याचे फायदे

१) पाठीच्या दुखण्यापासून आराम

योग्य मुद्रेत बसल्यास वजन योग्य राहतं. ज्यामुळे पाठीच्या हाडांवर ताण कमी पडतो. पाठीच्या हाडांवर ताण कमी पडल्यास पाठीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

२) वाढतो आत्मविश्वास

योग्य पोश्चर तुम्हाला आत्मविश्वासी बनवण्यास मदत करते. योग्य मुद्रेत उभे राहिल्याने तुमचा कॉन्फिडंस वाढतो. ज्यामुळे तुम्ही कायम सकारात्मक राहता.

३) श्वासोच्छवास

पाठीचा कणा ताठ ठेवून बसल्यास फुफ्फुस योग्य पद्धतीने काम करण्यास उत्फुर्त होते. ज्यामुळे तुम्ही दीर्घश्वास घेऊ शकता. जे शरीरात ऑक्सीजन लेव्हल वाढवून श्वासाचे उत्सर्जन योग्यप्रकारे करते.

४) पचनशक्ती सुधारते

शरीराचे योग्य पोश्चर तुम्हाला योग्यप्रकारे काम करण्यास प्रोत्साहित करतात. ज्यामुळे तुमची पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्यांचा धोकासुद्धा कमी होतो.

५) मजबूत मांसपेशी

ताठ बसल्याने मांसपेशी सक्रिय राहतात. ज्यामुळे मांसपेशींची ताकद आणि सहनशक्ती वाढते.

६) जॉइंट पेन

ताठ बसल्यास जॉइट पेन कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे गाठी आणि दुखणे यांसारख्या समस्या कमी होतात. (Health)

७) मणक्याचे दुखणे

वाकून चालण्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम तर होतोच पण तुमची उंचीही कमी दिसते. अशा वेळी जर तुम्हालाही वाकून चालण्याची सवय असेल तर आजपासूनच ही सवय बदलण्याचा प्रयत्न करा. यामुळे मणक्याचे दुखणेसुद्धा उमळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT