Body Changes: शरीरातील हे बदल म्हणजे किरकोळ आजार नाही तर कॅन्सरचा बॉम्ब असू शकतो!

Cancer Symptoms: कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राकेश तरण यांनीच दिलाय धोक्याचा इशारा
Body Changes:
Body Changes:Sakal Digital 2.0

Cancer Symptoms: लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत, पण कर्करोगाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे हेही खरे आहे. कर्करोग हा कोणत्याही एका प्रकारचा नाही. आतापर्यंत अशी कोणतीही पद्धत आलेली नाही, ज्याद्वारे कर्करोग होण्याआधीच ओळखता येईल किंवा कर्करोग टाळता येईल.

कॅन्सर हा असा आजार आहे की जो कोणालाही कधीही होऊ शकतो, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ.राकेश तरण सांगतात. हे टाळण्यासाठी जशी काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे देखील आवश्यक आहे. पण याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

Body Changes:
Blood Cancer Symptoms: लक्षणे साधीच असतात; पण ती रक्ताच्या कर्करोगाचीही असू शकतात

शरीरात काही बदल झाल्यास, काही असामान्य वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, तर लगेच वैद्यकीय सल्ला घ्या आणि चाचणी करून घेण्यास मागेपुढे पाहू नका. बरेच लोक याला आजार मानत नाहीत. यामुळेच अर्ध्या अपूर्ण उपचारानंतर रुग्णाचा कर्करोगाशी संबंधित आजार अत्यंत गुंतागुंतीच्या अवस्थेत पोहोचतो.

जेव्हा ट्यूमर लहान असतो तेव्हा तो पसरत नाही. अशा लहान ट्युमरवर योग्य उपचार केले जाऊ शकतात. जर तुम्ही कॅन्सरच्या किरकोळ लक्षणांकडे नेहमी दुर्लक्ष करत असाल किंवा तुम्ही कधीही तुमचे स्क्रीनिंग केले नसेल, तर कॅन्सर हळूहळू मोठा होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून तुमच्या शरीरात खाली दिलेले काही बदल दिसत असतील तर समजून जा की तुमचा कॅन्सर वाढला आहे किंवा पसरला आहे.

Body Changes:
Colon Cancer Symptoms : तरूणांमध्ये कोलन कर्करोगाचा धोका वाढतोय? काय आहेत त्याची कारणं!

जास्त वेळा असलेला खोकला

कॅन्सर हा एक असा आजार आहे, ज्याचे प्राथमिक अवस्थेत निदान करून उपचार केल्यास जीव वाचू शकतो. सर्वसाधारणपणे, जर एखाद्या व्यक्तीला खोकला येत असेल आणि तो दोन आठवड्यांनंतरही बरा होत नसेल, तर त्याला हलके घेऊ नका आणि त्याची तपासणी करून उपचार करा. हा सामान्य खोकला नसून टीबी असण्याची शक्यता आहे. कधीकधी अशा लोकांना कर्करोग होण्याची शक्यता असते.

छातीत दुखणे

एखाद्याला छातीत दुखत असेल किंवा गिळण्यास त्रास होत असेल, तोंडावर फोड येत असतील किंवा शरीरात कुठेही गुठळ्या असतील, वजन कमी असेल किंवा मल किंवा लघवीमध्ये रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

बद्धकोष्ठता

जर एखाद्याला दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि हळूहळू वाढत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या. कदाचित हे मूळव्याध नसून गुदद्वारातील किंवा आतड्यातील ढेकूळ असेल.

Body Changes:
Chiranjeevi Cancer Update: चिरंजीवीला झालाय कॅन्सर? अखेर अभिनेत्याने संतप्त प्रतिक्रिया देऊन मौन सोडलं

शरीरातील कमी रक्त

जेव्हा शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी तयार होत नाहीत तेव्हा एनीमिया होतो. हा आजार तुमच्या अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होतो. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांसारखे कॅन्सर तुमच्या अस्थिमज्जेला हानी पोहोचवू शकतात. इतरत्र पसरलेल्या गाठी लाल रक्तपेशी कमी करू शकतात म्हणून सावध राहिले पाहिजे.

महिलांमधील कॅन्सरचे मुख्य लक्षण

जर तुमच्या स्तनांच्या आकारात काही बदल होत असतील किंवा तुम्हाला त्यावर गाठी निर्माण झालेल्या वाटत असतील तर हे स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला स्तनाभोवतीच्या भागाचा रंग बदलणे, स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा असामान्य स्त्राव अर्थात डिस्चार्ज यांसारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.

अन्न गिळताना त्रास होणे

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घशात जाऊन अन्न किंवा काहीतरी अडकले आहे किंवा तुम्हाला दोन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ गिळताना त्रास होत असेल तर ते घसा, फुफ्फुस किंवा पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com