Rohini Nakshatra 2023 esakal
Horoscope | राशी भविष्य

Rohini Nakshatra : यंदा 'अशी' राहणार नक्षत्रांची स्थिती; काही नक्षत्रांत चांगला पाऊस, तर काहींकडून हुलकावणी

यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळा सुरू झाला आहे. या उकाड्याने सर्वसामान्यांना हैराण केले आहे.

राजेंद्र हजार

यंदा पंचांगात अनेक नक्षत्रात कमी पाऊस दाखवलेला आहे, तर काही नक्षत्रात पूरपरिस्थिती, वादळ वारे असल्यामुळे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

निपाणी : यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळा सुरू झाला आहे. या उकाड्याने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात एकही मोठा वळवाचा पाऊस (Rain) झालेला नाही. दुसरीकडे रोहिणी नक्षत्रात (Rohini Nakshatra 2023) मात्र जाणकारांच्या मते पावसाचे अंदाज नाहीत.

जून महिन्यातील गुरुवार (ता. ८) पासून मृग नक्षत्राला (Mrug Nakshatra) सुरुवात होत आहे. काही नक्षत्रात चांगल्या पावसाचे अंदाज आहेत. तरी काही नक्षत्रे मात्र कोरड्या आकाशाकडे पाहायला लावणार आहेत. यंदा पंचांगात अनेक नक्षत्रात कमी पाऊस दाखवलेला आहे, तर काही नक्षत्रात पूरपरिस्थिती, वादळ वारे असल्यामुळे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

नक्षत्रातील पावसाचे अंदाज

मृग : यंदा ८ जूनला सायंकाळी सहा वाजून ५३ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. शेवटी वादळी पावसाचे योग आहेत. ता. १०, १४, १६, १९ जून रोजी पावसाचा अंदाज आहे.

आर्द्रा : २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजून ४८ मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. या नक्षत्रात सर्वत्र चांगला पाऊस तर काही ठिकाणी पूरसदृश स्थिती होण्याचे योग आहेत. ता. २५, २८ जून, १, २, ३ जुलै रोजी पावसाचा अंदाज आहे.

पुनर्वसू : ६ जुलैला सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. परंतु, अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस असेल. ता. ७, ९, १३, १६ आणि १९ जुलैला पावसाचा अंदाज आहे.

पुष्य : २० जुलैला दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पावसाळी वातावरण असले तरी म्हणावा तसा पाऊस पडणार नाही. ता. २०, २३, २७, २९ जुलै व १ ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज आहे.

आश्लेषा : ३ ऑगस्टला दुपारी ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करेल. उत्तम पावसाचा अंदाज आहे. परंतू कमी पाऊस राहण्याची चिन्हे आहेत. ता. ५, ८, ११ ते १५ ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज आहे.

मघा : १७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. २१ ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ता. १८, २०, २६, २८, ३० ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज आहे.

पूर्वा : ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस होण्याची चिन्हे आहेत तर काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होण्याची शक्यता आहे. ता. १ ते १०, १२ सप्टेंबर रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तरा : १३ सप्टेंबर रोजी उत्तर रात्री ३ वाजून २५ मिनिटांनी सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात काही भागात उत्तम पाऊस होण्याची शक्यता आहे. ता. १४, १५, १८, २०, २३, २५, २६ सप्टेंबरला पावसाचा अंदाज आहे.

हस्त : ता. २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात भागात ब-यापैकी पाऊस होईल. विदर्भात अत्यंत कमी पाऊस होईल, ता. २८ सप्टेंबर, २, ७, ९ ऑक्टोबरला पावसाची शक्यता आहे.

चित्रा : ता. ११ ऑक्टोबर रोजी ६ वाजून ५८ मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात वारा आणि पाऊस असा योग येत आहे. अनेक ठिकाणी वादळ होण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. ता. १२, १३, १५, १८, २२ ऑक्टोबरला पावसाचा अंदाज आहे.

स्वाती : २४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करेल. या नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ता. २५, २८, ३० ऑक्टोबर व त्यानंतर ता. २, ४ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज आहे. यंदा दिवाळीच्या सणावर मात्र पावसाचे सावट आलेले नाही.

विविध पंचांगांच्या अंदाजानुसार यावर्षीचे पर्जन्यमान चांगले राहणार आहे. काही नक्षत्रात कमी तर काही नक्षत्रांत जास्त पाऊस होईल. पाऊस कमी-जास्त झाला तरी सरासरी इतका होईल. मात्र, वादळ वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान, पिकांवर नवीन रोग पडण्याचा अंदाज आहे. एकंदरीत जनावरांच्या चारा-पाण्याची अडचण येणार नाही, असाही अंदाज पंचांगात वर्तविण्यात आला आहे.''

-शरद जोशी, पुरोहित, बेनाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या परिसरात छोट्या विमानाच्या गिरट्या; नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण...

Satana Suspicious Case : मध्यरात्रीच्या संशयास्पद विधीने खळबळ; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल, तपास वेगात

SCROLL FOR NEXT