Dengue vaccine esakal
जळगाव

Jalgaon Dengue News : अयोध्यानगरात आढळले डेंग्युचे रूग्ण; महापालिकेतर्फे परिसरात धुराची फवारणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Dengue News : अयोध्यानगर भागात डेंग्यु आजाराचे रूग्ण आढळले असून, महापालिकेतर्फे परिसरात धूर फवारणी करण्यात आल्याची माहिती नगरसेवक विरेन खडके यांनी दिली. (125 dengue patients found in Ayodhyanagar jalgaon news)

शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंग्यूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. आतापर्यंत जवळपास १२३ जणांना डेंग्यूची बाधा झालेली आढळून आलेली आहे. अयोध्यानगरातही आता तब्बल १५ रूग्ण आढळून आल्याची माहिती नगरसेवक खडके यांनी दिली.

ते म्हणाले, आपण अयोध्यानगर परिसरातील सदुगूरूनगर, शांती निकेतन हाऊसिंग सोसायटी, श्रीकृष्णनगर, गोपाळपुरा, यमुनानगर, चिमुकले बालाजी मंदिर, हॉटेल गौरवचा मागील परिसर, पोल फॅक्टरी आदी परिसरात महापालिकेतर्फे धूर फवारणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?


महापालिका प्रशासनातर्फे रोज अबेटिंग, पाण्यात टाकण्याचे औषध, जंतुनाशक फवारणी आणि डेंग्यू पॉझिटिव्ह असलेल्या परिसरात धूर फवारणी (फॉगिंग) आदी उपाय केले जात आहेत.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनी कोरडा दिवस पाळावा, पाणी साठवून ठेऊ नये, घरात कुलर जाळ्या काढून टाकाव्यात, गच्चीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, टायर, कुंड्या यात पाणी साचू देऊ नये असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT