arrears sakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिका घरपट्टी थकबाकीचा नागरिकांकडून 2 कोटींचा भरणा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : महापालिकेने जळगाव हद्दीतील थकीत मालमत्ता करधारकांसाठी शंभर टक्के शास्ती योजना जाहीर केली आहे. योजनेंतर्गत आतापर्यंत दोन कोटींचा भरणा करण्यात आला.

महापालिकेने माफीची अभय योजना ४ ते १९ डिसेंबर यादरम्यान घोषित केली आहे. ()

चार दिवसांत नागरिकांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा भरणा झाला आहे. महापालिकेच्या प्रभाग समिती एक ते चार क्षेत्रातील ४८१ मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा थकबाकी भरणा केलेला नाही.

त्यामुळे महापालिकेने या मिळकतधारकांना नोटीस देऊन दहा दिवसांचे आत थकीत करांचा भरणा चालू करांच्या रकमेसह भरण्याबाबत कळविले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९० थकबाकी मिळकतधारकांनी पूर्ण रकमेचा भरणा केला आहे.

जे थकबाकी मालमत्ता मिळकतधारक भरणा करणार नाहीत, त्यांच्या मिळकती लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहेत. शहरातील मालमत्ता मिळकत करधारकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

कार्यालय शनिवार व रविवारही सुरू राहणार असून, मालमत्ताधारकांना आपल्या कराचा भरणा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष भरणा करता येईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: शिवाई बस- दुचाकीची समोरासमोर धडक; लोखंडी सावरगावजवळ भीषण अपघात तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT