Police inspectors and staff with seized ganja at Railway Security Force office.  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गांधीधाम एक्सप्रेसमधून 24 किलो गांजा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील सुरक्षा बलाचे सहाय्यक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावळदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी (ता. ४) तपासणी करीत होते. (24 kg ganja seized from Gandhidham Express Jalgaon Crime News)

गाडीच्या मागील जनरल डब्ब्यामध्ये श्वान वीरूला दोन संशयित बॅग आढळल्या. एका बॅगेमध्ये कपडे, तर दुसऱ्या बॅगमध्ये प्लॅस्टिक पिशवीमध्ये २४ किलो गांजा आढळून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षा बलाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी गांजा जप्त केला.

मलकापूरवरून भुसावळ रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर पोचली असता, भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, गोपनीय विभागाचे सुरेश भगत, अवधेश कुमार, अमोल पाटील यांनी जनरल डब्ब्यात प्रवेश केला. सीट क्रमांक २२ ते २५ वर दोन बेवारस बॅग मिळून आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बॅग उघडली असता, अंबट उग्रवास आला व बीज असलेला २४.५२५ किलो ओला गांजा आढळला. त्याची २,४५,२५० रुपये किंमत आहे.

नायब तहसीलदार शोभा राजाराम घुगे यांच्यासमक्ष गांज्याची मोजमाप करण्यात आले. ही कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी. पी. कुशवाहा यांच्या आदेशावरून निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक के. आर. तर्ड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT