burglary esakal
जळगाव

Jalgaon Crime : निवृत्त शिक्षकाच्या घरी 70 हजारांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : गावाकडे गेलेले निवृत्त शिक्षक नीना सोनाजी सावळे (वय ६१, रा. संभाजीनगर, गाडगेबाबा चौकाजवळ) यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी १७ हजार रुपये रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

श्री. सावळे हे १३ सप्टेंबरला कुटुंबीयांसह शेंदुर्णी येथे गेले होते. (70 thousand stolen from retired teachers house jalgaon crime )

दरम्यानच्या काळात चोरट्याने त्यांच्या किचनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत, वरच्या मजल्यावरील खोलीतून १७ हजार रुपये रोख, २० हजार रुपये किमतीची सोनसाखळी, १० हजार रुपये किमतीची अंगठी, आठ हजार रुपये व दुसरे पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढे, पाच हजार रुपये किमतीची चांदीची पैंजण, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सावळे हे १८ सप्टेंबरला सायंकाळी परत आले असता, ही बाब लक्षात आली. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Vaibhav Sooryavanshi चा खेळ पाहण्यासाठी अजित आगरकर चेन्नईत पोहोचणार! KL Rahul ची माघार, हा सामना कुठे रंगणार, Live कुठे?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Teachers Day 2026: आयुष्यभराची २५ लाखांची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्चली; शिक्षकाने उभारली वंचितांसाठी शाळा!

SCROLL FOR NEXT