
गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या वांद्रे टर्मिनस परिसरात एका तरुणाची हत्या केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विक्रम सिंग (३५ वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
हा तरूण मूळचा राजस्थानचा असून सध्या खार पूर्व परिसरात तो राहत होता. या खून प्रकरणी वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस खुन्याचा शोध घेत आहेत.