cotton sowing esakal
जळगाव

जळगाव जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या उरकल्या

सर्वाधिक ९९ टक्के कापसाचा पेरा, शेतकऱ्यांमध्ये लगबग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने एकूण ७९ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. एकूण पेरणीच्या ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) कापसाचा पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

यंदा जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. जूनमध्ये एकदा जोरात पाऊस झाला. नंतर पावसाने ओढ दिली. पहिल्या जोरदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र नंतरच्या ओढीने दुबार पेरणीचे संकट उभे होते. जुलैत मात्र चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकण्यावर भर दिला आहे. खरीपाचे एकूण क्षेत्र यंदा ७ लाख ७० हजार ८७४ हेक्टर होते.

त्यापैकी आतापर्यंत ६ लाख ११ हजार ५०९ हेक्टवर (७९ टक्के) पेरण्या झाल्या आहे. कपाशीचा विचार करता कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९८ हजार ९२५ हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. त्यातील कोरडवाहू पेरण्या २ लाख ७४ हजार ५८४ हेक्टरवर तर बागायती पेरण्या २ लाख १९ हजार ४४ हेक्टरवर झाल्या आहेत.

तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा

तालुका टक्के

  • जळगाव- -७२ टक्के

  • भुसावळ- -६१

  • बोदवड- -९२

  • यावल --६७

  • रावेर- -७१

  • मुक्ताईनगर- -७७

  • अमळनेर- -८५

  • चोपडा- -७२

  • तालुका टक्के

  • एरंडोल- -८८

  • धरणगाव- -७८

  • पारोळा- -९९

  • चाळीसगाव-- ६९

  • जामनेर-- ९४

  • पाचोरा --७२

  • भडगाव --८१

एकूण ७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Winds Strengthen : मॉन्सूनच्या वाऱ्याचा वेग वाढला! महाराष्ट्रात दक्षिण कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर चार दिवस मुसळधार

मुलीच्या वादाचं प्रकरण, २२ वर्षीय कॉलेज तरुणाकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी; APIसह हवालदाराला अटक

Latest Marathi News Update: डीआरआयची नागपुरात मोठी कारवाई, ५२२ किलोहून अधिक गांजा जप्त

Gold Rate Today: RBIच्या निर्णयानंतर आज मोठी घसरण! 8 दिवसांत सोन्याचे भाव कोसळले; चांदीही स्वस्त, महाराष्ट्रात आजचा भाव किती?

भारताच्या आर. प्रज्ञानंदने Norway Chess चे विजेतेपद जिंकून घडवला इतिहास! १४ वर्षांत अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT