Goat  esakal
जळगाव

Jalgaon News : श्रावण संपण्यापुर्वीच ‘बोकडां’वर संक्रांत; नांद्रा बुद्रुक येथून 9 बकऱ्या व 11 बोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : श्रावण महिना संपायला अवघे काही तास शिल्लक असतानाच गोठ्यात बांधलेल्या ९ बकऱ्यांसह ११ बोकड चोरट्यांनी रात्रीतून चोरुन नेले. नांद्रा बुद्रुक (ता. जळगाव) येथे हा प्रकार उघडकीस आला.

श्रावण मासात मटण-मासे खाणे बंद असताना उपलब्धतेनुसार दरही नियंत्रणात होते. मात्र, श्रावण संपत आला असताना चिकन, मटण आदींच्या मागणीत वाढ होत आहे. परिणामी, गाव-खेड्यांतील पशुधन चोरीला जावु लागले आहे. (9 goats and 11 bucks stolen from Nandra Budruk jalgaon news)

नांद्रा बुद्रुक गावात चांदसर रस्त्यावर विजय श्रावण बाविस्कर व रवींद्र प्रकाश वाघ या पशुपालकांचा गोट फार्मवजा गोठा आहे. शनिवारी (ता. ९) रात्री आठला त्यांनी आपल्या बकऱ्या व बोकड गोठ्यात बांधले होते.

त्यानंतर ते घरी आले. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १०) सकाळी सातच्या सुमारास चोरट्याने नऊ बकऱ्या व ११ बोकड असे तब्बल लाख रुपयांचे पशुधन चोरुन नेल्याचे आढळून आले. त्यांनी सर्वत्र विचारपुस व शोध घेतला; परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही.

त्यानंतर बाविस्कर यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक ईश्‍वर लोखंडे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोबंडे-बोकडची वाढली मागणी

श्रावण महिन्यामुळे गेल्या महिनाभर जिभेवर नियंत्रण ठेवणाऱ्या खवैय्यांना केव्हा श्रावण संपतो, याचेच वेध लागले आहे. त्यातच येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १४) दर्श आमवस्येनंतर शुक्रवार व रविवारी सामिष जेवणाच्या पार्ट्यांचे नियोजन अनेकांनी केले आहे.

हॉटेल्समध्येही बुकींग सुरु झाले असून, मटणासाठी बोकड आणि चिकनसाठी कोंबड्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीला संधी समजुन गाव-खेड्यांतून कोंबड्या, बोकड, बकऱ्या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान, पोलिसही अनेक वेळा तक्रार न घेता अर्जावरच वेळ मारुन नेत असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

Protest News: एसआयआर’ रद्द करा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या; दिल्लीतील आंदोलनात आंदोलकांच्या जोरदार घोषणा

SCROLL FOR NEXT