up murder sakal media
जळगाव

अमळनेर येथे युवकाचा निर्घृण खून

पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; आर्थिक देवाणघेवाणीतून झाला खून

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : अमळनेरात (amalner) भल्या पहाटे युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकाश दत्तू चौधरी रा.जुना पारधी वाडा (वय ३४) याचा मृतदेह शहरातील मध्यभागी असलेल्या नगरपालिकेच्या हशीमजी प्रेमजी संकुलाच्या वरच्या माळ्यावर आढळून आला. मृतदेहाच्या बाजूला रक्ताचा सडा पडलेला होता, मध्यरात्री किंवा भल्या पहाटे धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याचा अंदाज आहे. मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला असून, त्यातून काही गोष्टी उघडकीस येतील. आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

मयत प्रकाश चौधरी यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयित कैलास शिंगाने याच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. शिंगाने याला मयत चौधरी याने १ लाख रुपये दोन वर्षांपासून दिलेले असतांना तो ते परत करत नव्हता यातून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. त्यातच कैलास शिंगाने यांच्या दुकानासमोरच खून झाल्याने त्यावर पोलिसांचा संशय बळावला होता.

संकुलात शालेयस्तरापासून पासून तर महाविद्यालयाचे शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असतात. विद्यार्थ्यांच्या नजरेला सर्वात प्रथम मृतदेह पडल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर, मिलिंद भामरे यांच्या पथकाने शिंगाने याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला विचारपूस केली असता कैलास शिंगाने बाहेरगावी असल्याचे समजले. अधिक तपासात तो चोपड्याला फरार झाला असल्याची माहिती मिळाली, यावरून पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला चोपड्यातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्हा कबुल केला असून अधिक माहिती चौकशीतून निष्पन्न होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

Latest Marathi News Live Update : दिल्लीत हाय अलर्ट! सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द, अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश

Dharmendra Pradhan salary : केंद्रीय कॅबिनेट शिक्षण मंत्र्यांवर सरकारचा दरमहा किती खर्च? धर्मेंद्र प्रधान यांच्या उदाहरणातून समजून घ्या

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

SCROLL FOR NEXT