राणे विरुद्ध शिवसेना; रमेश मोरेची हत्या का झाली?

पुन्हा खणखणीत वाजवणार- नारायण राणे
narayan rane
narayan ranesakal

रत्नागिरी : आम्हाला घरात बसून कारभार करायचा नाही. माझ्याकडे पुष्कळ मसाला आहे. रमेश मोरेची हत्या का झाली, कारण काय? वहिनीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितले, अशा अनेक गोष्टी माहिती आहेत. टप्याटप्याने मी प्रकरणे काढणार. सुशांत, दिशा सालियनची केस संपली नाहीये. कायदा आम्हालाही माहिती आहे. दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड नाही. ३९ वर्षे होतो मी. तुम्ही अनुभवले आहे आम्हाला, जवळून पाहिले आहे. नको त्या वाटेत जाऊ नये, पुन्हा एकदा मी खणखणीत वाजवणार, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

भाजप कार्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे सांगून यावर सुद्धा केस करतील, अशी खिल्ली उडवली. शिवसेनेचे नाव एक-दोनदाच घेऊन राणे यांनी टीका केली. आमच्या घरावर हल्ला करणाऱ्या वरुण सरदेसाईला अजून अटक झाली नाही. त्याला पोलिस बंदोबस्त असूनही तिथल्या मुलांनी चोपला. तो परत आला तर परत जाणार नाही. आम्ही सोडणार नाही. तो जमा करून आणतो, त्याची वट म्हणून अटक झाली नसेल, असेही राणे यांनी सांगितले.

राणे पुढे म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रेला भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. रात्री एकेक वाजेपर्यंत लोक ६ ते ७ तास वाट पाहत थांबले होते. हे भाग्य यांच्या नशिबी नाही. पूर्वी घडलेल्या घटनेवर पत्रकारमित्रांनी प्रश्न विचारला. बोललो मी. त्यावेळी मी तिथे असतो तर आवाज आला असता, असतो तर ना. पण दरोडेखोराला अटक करतात तसे केंद्रीय मंत्र्याला अटक करायला २०० पोलिस. काय पराक्रम आहे. महाराष्ट्रात सर्व जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. चिपळूण, महाड पूरस्थितीत भरपाई मिळाली नाही.

माझ्या विभागामार्फत अनेक योजना कोकणात राबवायच्या आहेत. फळफळावळ, आंबा, काजू, महिलांसाठी विविध उद्योग योजना आहेत. कोकम बियांपासून औषधे बनवतात, फणसाच्या आठळांची पावडर निर्यात होते. माझ्या मंत्रालयाकडून १, ५० आणि आणि २५० कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. एकदा अधिकाऱ्यांना घेऊन येईन आणि सर्व माहिती सांगितली जाईल.यावेळी भाजप कार्यालयात भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, भाजप उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आदी पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

narayan rane
'आपल्याच वहिनीवरती ॲसिड फेकण्यास कोणी सांगितलं?'

वनवास संपणार

जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले, गेली २० वर्षे भाजपने सतत पराभव बघितला आहे. परंतु दादांच्या रूपाने आज हक्काचा, आमचा माणूस मिळाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. तुमच्या येण्यामुळे भाजपला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांचा वनवास आता संपणार आहे, आम्ही नक्की जिंकू. कार्यकर्ते उत्साहीत आहेत. आता आम्ही भाजपच्या विजयासाठी निवडणूक लढवू.

मी परत येणारच

आज जास्त वेळ मिळाला नसला तरी मी परत येणार आहे. मला यायला १ तास २० मिनीटे लागतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी. भाजपचे सर्व आमदार, खासदार माजी नव्हे तर आजी व्हायला पाहिजेत. याकरिता मेहनत घ्या, असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com