नाना पटोलेंवर गुन्हा नोंदवून अटक करा sakal
जळगाव

जळगाव : नाना पटोलेंवर गुन्हा नोंदवून अटक करा

मोदींबद्दल अपशब्द; भाजपचे निवेद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल (PM Narendra Modi)आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पटोलेंवर गुन्हा (Nana Patole)दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी भाजप जिल्हा महानगर व ओबीसी मोर्चातर्फे करण्यात आली. यासंदर्भात आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले.

पंतप्रधानांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्या विरुद्ध त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. अन्यथा भाजपा ओबीसी मोर्चा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महानगराध्यक्ष जयेश भावसार, नगरसेवक राजू मराठे, उपाध्यक्ष अमित भाटिया, चिटणीस राहुल वाघ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT