जळगाव : महामार्गावरील सर्कलच्या नावावरून पेटला वाद

परस्पर नामकरणाचा प्रयत्न; अखेर पोलिसांनी काढले बेकायदा फलक
Highway
Highwaysakal

जळगाव : महामार्ग चौपदरीकरणाचे काम (Highway work)अंतिम टप्प्यात येत असताना त्यावरील चौकांमध्ये तयार झालेल्या सर्कलचे (circle)संबंधित यंत्रणेकडून परवानगी न घेता परस्पर नामकरण (Name of road)करण्याचे प्रकार झाल्याने चांगलाच वाद पेटला आहे. मंगळवारी (ता. १८) सकाळी पोलिस बंदोबस्तात आकाशवाणी चौक व अजिंठा चौकातील सर्कलवर लावलेले फलक हटविण्यात आले.

Highway
जळगाव : भुसावळला बँकेवर दरोड्याचा प्रयत्न

या कारवाईदरम्यान मंगळवारी अजिंठा चौकातील सर्कलच्या नावाच्या मुद्यावरुन दोन गट समोरासमोर आले. त्यात तिसऱ्या गटाने उडी घेत तिसरी मागणी केली. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावही निर्माण झाला होता. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आकाशवाणी चौक, इच्छादेवी व पुढे अजिंठा चौकात रोटरी सर्कल करण्यात येत आहे. पैकी आकाशवाणी चौकातील सर्कलचे काम सुशोभीकरणासह पूर्ण झाले आहे. इच्छादेवी चौकातील सर्कलचे काम नुकतेच सुरू झाले असून अजिंठा चौकातील सर्कलचे कामही लवकरच पूर्णत्वास येईल.

सर्कल आले वाद घेऊन

मात्र, महामार्गावरील या तीनही चौकातील सर्कल वाद घेऊन आले आहेत. आकाशवाणी चौकातील सर्कलला जिजाऊंचे नाव द्यावे, अशी मागणी झाल्यानंतर दुसर्या दिवशी काही उत्साही कार्यकर्त्यांनी या सर्कलचे नामकरणही उरकून टाकले. त्यानंतर दुसऱ्या संघटना पुढे आल्या आणि त्यांनी या चौकाला आधीच जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव असल्याचे लक्षात आणून देत महापौरांसह नगरसेवकांना निवेदन दिले.

Highway
जळगाव : लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

अजिंठा सर्कलवरुन वाद

आकाशवाणी चौकातील वाद अद्याप कायम असताना मंगळवारी अजिंठा चौकातील सर्कलच्या नावावरून नवा वाद उद्‌भवला. काही कार्यकर्त्यांनी सर्कलच्या ठिकाणी मीर शुक्रुल्ला यांच्या नावाचा फलक लावला तर काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाचा फलक लावला. तर या चौकालगत असलेल्या अजिंठा सोसायटीतील नागरिकांनी सर्कलचे नाव अजिंठा सोसायटीच्या नावानेच असावे, असा पवित्रा घेतला. त्यामुळे हा वाद चांगला विकोपाला गेला.

पोलिसांनी काढले फलक

हे वाद होत असताना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचत हे फलक काढले. शिवाय, चार दिवसांपूर्वी आकाशवाणी सर्कलमध्ये लावलेला फलकही काढण्यात आला.

Highway
चांदीचे दर प्रतिकिलो एक लाखांवर जाणार?

बेकायदा नामकरण

चार दिवसांपूर्वी आकाशवाणी चौक व मंगळवारी अजिंठा चौकातील सर्कलच्या ठिकाणी काही उत्साही कार्यकर्त्यांनी एकत्रित येत परस्पर नामकरण करुन फलक लावले. त्यासाठी कोणत्याही यंत्रणेची परवानगी घेण्यात आली नाही, किंवा त्यासंबंधी योग्य ती प्रक्रियाही पूर्ण करण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण नसताना आकाशवाणी चौकातील सर्कलचे परस्पर नामकरण करतेवेळी स्वत: महापौरही उपस्थित होत्या.

या चौकांना आधीपासूनच नाव

ज्या चौकांच्या नामकरणावरुन सध्या वाद उद्‌भवला आहे, त्या चौकांचे पालिकेच्या ठरावानुसार आधीच नामकरण झाले आहे. पैकी आकावाणी चौकाला जनरल अरुणकुमार वैद्य यांचे नाव असून अजिंठा चौकाचे नामकरण नेल्सन मंडेला चौक असे झाले आहे.

अशी आहे प्रक्रिया

मुळात शहराच्या हद्दीत कोणत्याही चौक अथवा मार्गाला महापुरुष अथवा कुणाचे नाव द्यायचे झाल्यास त्याची एक पद्धत व प्रक्रिया आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव पालिकेच्या सभेसमोर मांडला जातो, तो मंजूर झाल्यानंतर त्याचे नामकरण केले जाते. महामार्गावरील चौक पालिकेच्या हद्दीतून गेला असेल तर त्यासाठीही पालिकेच्या सभेचाच ठराव आवश्‍यक असतो.

महामार्गावरील सर्कलचे परस्पर नामकरण करणे योग्य नाही. यासंदर्भात ठरावीक प्रक्रिया असून महापालिकेकडे रीतसर निवेदन देऊन, महासभेच्या ठरावानंतर चौकांचे नामकरण करता येऊ शकते. त्यामुळे कुणीही परस्पर हे प्रकार करू नये.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस अधीक्षक, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com