crime esakal
जळगाव

प्रेम विवाह केल्याने जावयासह कुटूंबीयांवर हल्ला

प्रेमविवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : प्रेमविवाह केल्याच्या रागातून पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. इतकेच नाही तर घराबाहेर उभ्या रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी भावेश रमेश गोसावी (वय २२) पत्नी जागृती व कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. भावेशने जागृतीशी प्रेमविवाह केला आहे. त्यामुळे जागृतीचे नातेवाइकांच्या मनात त्याचा प्रचंड राग होता. रविवारी (ता. १५) भावेश हा पत्नी व नातेवाईकांसोबत रिक्षाने विशाल पेट्रोल पंपाजवळील गुलाबाबा कॉलनी रोडवरील नर्सरी समोरून जात असताना गजेंद्र घुगे-पाटील, निलेश राजेंद्र घुगे, दुर्गेश गजेंद्र घुगे, निखिल राजेंद्र घुगे, तुषार राजेंद्र घुगे आणि जितेंद्र घुगे-पाटील यांच्यासह इतर २ ते ३ जण (सर्व रा. लक्ष्मीनगर जळगाव) अशांनी त्यांची रिक्षा अडवून भावेशसह त्याची आई व नातेवाइकांना बेदम मारहाण करून जखमी केले. तर, रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर भावेशची पत्नी जागृती हिला बळजबरी घेऊन गेले. भावेश गोसावी याने एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नितीन पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT