Fri, June 2, 2023

''कोणाच्या गाडीवर पाहीले'' विचारल्याचा आला राग; विवाहितेस मारहाण
Published on : 16 May 2022, 9:30 am
वरणगाव (जि. जळगाव) : येथील आयुध निर्माणी वसाहत नजीक मिलिंदनगरातील महिलेस मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चार जणांवर वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार ११ मे रोजी सकाळी सात वाजता आयुध निर्माणी वसाहतलगत मिलिंदनगर मधील गिता गाडे यांनी वैशाली प्रवीण तायडे हिस ‘मला कोणाच्या गाडीवर पाहिले’ असे विचारले असता त्याचा राग आल्याने वैशालीने गीता हिस मारहाण करून जखमी केले. तसेच इंदाबाई तायडे, चंद्रकांत तायडे, प्रवीण तायडे यांनीही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गीता हिच्या फिर्यादीवरून उपरोक्त चार जणांविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.