Bhairavi Wagh Palande has been appointed as state vice president of BJP jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon BJP News : भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षापदी भैरवी वाघ-पलांडे यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon BJP News : जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली असून, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. (Bhairavi Wagh Palande has been appointed as state vice president of BJP jalgaon news)

आर्किटेक्ट भैरवी यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे ‘अभाविप’च्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली होती. पक्ष संघटनेत त्यांची कारकीर्द अधिकच उज्ज्वल राहिल्याने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जवाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भैरवी या माजी आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ व (स्व.) उदय वाघ यांच्या कन्या असून, पुणे येथील जयश्री व अ‍ॅड. अशोकराव पलांडे यांच्या स्नूषा आहेत.

त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, रावेर खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे, विभाग संघटन मंत्री रवी अनासपुरे, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT