Vijay Soni  esakal
जळगाव

Jalgaon News : बहिणीच्या औक्षणाआधीच भावाचा रेल्वेतून पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भाऊबीजेसाठी बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे बहिणीकडे जात असलेल्या येथील इंग्रजी शाळेतील शिक्षकाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. शिरसोली ते जळगावदरम्यान १५ नोव्हेंबरला ही घटना घडली.

भाऊबीज साजरी होण्याआधीच भावाच्या दुर्दैवी मृत्यूने बहिणीसह कुटुंबीयांनी आक्रोश केला.(Brother died by falling from train on bhaubeej jalgaon news)

विजय श्याम सोनी (३२, मूळ रा. बऱ्हाणपूर, ह.मु. जळगाव) असे मृताचे नाव आहे. ते जळगावातील रुस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक होते. मामांचा मोबाईलवर कॉल आल्यानंतर त्यांची ओळख पटली.

विजय सोनी हे दिवाळीनिमित्त कल्याण येथील त्यांच्या मामांकडे गेले होते. कल्याणहून ते बऱ्हाणपूर येथे बहिणीकडे भाऊबीजसाठी रेल्वेने जात होते.

त्या वेळी शिरसोली नजीक रेल्वे खांब क्रमांक ४०७ जवळ धावत्या रेल्वेतून ते खाली पडले. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सचिन भावसार हे घटनास्थळी पोचले.

त्यांनी सोनी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagaland IED Blast: आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ IED ब्लास्ट! १ जवान शहीद, ४ जण जखमी; स्फोटानंतर मोठे सर्च ऑपरेशन

Leopard Attack in Pune: शिंगवे परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला; प्रसंगावधानामुळे जीव वाचला, ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Cemetery Wall Repair: ‘सकाळ’च्या वृत्ताला प्रतिसाद; दावडी स्मशानभूमी भिंत दुरुस्तीला १० लाख मंजूर, आणखी निधीची ग्रामस्थांची मागणी

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT