jalgaon sakal
जळगाव

सिनेमागृह सुरू.. पण, प्रेक्षकांची पाठ!

पहिला दिवस निराशाजनक; मल्टीप्लेक्सला अल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तब्बल नऊ महिन्यांनंतर सिनेमागृह शुक्रवारपासून सुरू झाली खरी, मात्र प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. तुरळक प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृहांचे पडदे आज खुले झालेत. सिंगल स्क्रीन सिनेमागृहांच्या तुलनेत मल्टीप्लेक्सला चांगला प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मार्च २०२१मध्ये लॉकडाऊन जारी झाले आणि सर्वच सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. नोव्हेंबर २०२१पर्यंत त्यामुळे देशातील सर्व बंदिस्त सभागृह, नाट्यगृहे, सिनेमागृहे बंद होती. राज्यात नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेत सिनेमागृहे सुरू झाली. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर मार्च महिन्यापासून सिनेमागृह व रंगमंचावरील पडदा ‘ऑफ’ झाला.

सिनेमा सुरू, प्रेक्षक नाही

तब्बल ९ महिन्यांनी शुक्रवारपासून सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासह सिनेमागृह सुरू झाली. जळगावात अशोक, रिगल, मेट्रो, राजकमल या सिंगल स्क्रीन सिनेमागृहांसह पीव्हीआर, आयनॉक्स ही मल्टीप्लेक्सही सुरू झालीत. मात्र सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रेक्षकांनी चित्रपटांच्या शो कडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. पीव्हीआर, आयनॉक्स या मल्टीप्लेक्स सिनेमागृहांमध्ये काही हॉलीवुडची चित्रपटे असल्याने त्यांना काहीसा प्रतिसाद मिळाला.

नव्या चित्रपटांनंतर प्रेक्षक येतील

गेली काही महिने चित्रपटगृहे बंद असल्याने नवीन चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. पुढील दोन-तीन आठवड्यात काही बिगबजेट व चर्चित सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, तेव्हा प्रेक्षक आपोआप सिनेमागृहांकडे वळतील, असा विश्‍वास वितरक इंद्रवदन त्रिवेदी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

ही आहेत कारणे

  1. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने काही सिनेमागृहांमध्ये आज दिवसभरात एक-दोनच शो झालेत. त्याची काही कारणे समोर आली.

  2. एकतर ९ महिन्यांनी सिनेमागृह सुरू झाले, त्याबद्दल अद्याप जनजागृती झालेली नाही.

  3. सिनेमागृहांमध्ये प्रवेशासाठी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक असल्याने त्याचाही परिणाम जाणवला.

  4. चित्रपटगृह बंद असल्याने अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत.

  5. जे चित्रपट प्रदर्शित झालेत, ते प्रेक्षकांनी टीव्ही, मोबाईलवर पाहिलेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT