Fri, March 31, 2023

Covid19: राज्यात 40 मृत्यू, तर नव्या 1632 रुग्णांची भर
Published on : 22 October 2021, 4:02 pm
मुंबई: राज्यात आज 1632 बाधित रुग्णांची नोंद झाली.तर 40 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा 1,39,965 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 24,138 इतकी आहे.
करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,99,850 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण वाढले आहेत. तर 1744 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,32,138 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.46 % एवढे झाले आहे.
नागपूर,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 10,नाशिक 10,पुणे 10,कोल्हापूर 7,लातूर 2,अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,98,958 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 998 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.