Jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon : बंद दुकान फोडून रोकड लांबविली

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील एका बंद दुकानाचा कुलूप तोडून गल्यातील एकूण २२ हजार रुपये रोकड अज्ञाताने लांबविल्याची (Stolen) घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. (Closed cutlery shop burglary Jalgaon crime news)

सविस्तर वृत्त, शहरातील नेताजी चौक येथील प्रभुलिंग मन्थन जंगम (वय-४०) हे वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास असून त्यांच्या मुळ मालकीची रेल्वे रस्त्याला जंगम नावाची कटलरीची दुकान आहे. या दुकानावर ते आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान जंगम हे नेहमीप्रमाणे सोमवार, २० रोजी दुकानावर आले. दिवसभरात त्यांनी कटलरीच्या वस्तूंची विक्री केली. एकाच दिवसात त्यांना २२ हजार १५० रुपयांचा धंदा झाला. त्यावर त्यांनी सदर रक्कम दुकानातील एका गल्यात ठेवली. आणि तो नेहमीप्रमाणे घरी निघून गेला. त्यानंतर जंगम हा मंगळवार, २१ रोजी सकाळी ९ वाजता दुकानावर आला. तेव्हा त्याला दुकानाच्या शटरला लावलेला कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्यांनी लागलीच शेजारील दुकानदारांना बोलावून मध्ये पाहणी केली. तेव्हा गल्यातील रोकड मिळून आले नाही. कोणीतरी अज्ञाताने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून प्रभुलिंग मन्थन जंगम यांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किल्लारीचा प्रवास: १९९३च्या महाभूकंपातून भेगाळलेल्या जमिनीवर उभी राहिली भविष्याची स्वप्ने

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

Army Harassment: वरिष्ठांचा त्रास, जवानाने जीव संपवला ; लष्करी वसाहतीतील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT