एअर काँनेक्टिव्हिटीसाठी राजकीय आडकाठी दूर होणे आवश्यक

nashik ozar airport
nashik ozar airportesakal

नाशिक : देशात बंगलोरनंतर ओझर विमानतळावरील (Ozar Airport) धावपट्टीचा क्रमांक लागतो. सध्या मालवाहू तसेच पाचशे प्रवासी क्षमतेची सहा विमाने येथे पार्किंग होऊ शकतात. आवश्यकता भासल्यास बारापर्यंत पार्किंग होऊ शकते. असे असताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होत नसल्याने यात निर्माण होत असलेली राजकीय आडकाठी दूर होणे आवश्यक आहे. (Political barriers to air connectivity of ozar airport Nashik news)

आयटी उद्योगांच्या विस्तारासाठी हवाई सेवा गरजेचे आहे. नाशिक शहरात आयटी उद्योगांसाठी क्षमता असूनही, विमानसेवा नसल्याने या प्रकारचे उद्योग स्थापन होत नाहीत. त्यामुळे निश्चित व निरंतर हवाई सेवा सुरू होण्यासाठी ओझर विमानतळाच्या क्षमता उजेडात आणण्यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे हवाई धावपट्टीचा मुद्दा समोर आल्यानंतर किमान पाचशे प्रवासी क्षमेतेची, तसेच सहा कार्गो विमानाचे पार्किंग होऊ शकतात ही बाब समोर आली आहे. भविष्यात विस्तार करायचा झाल्यास आणखी सहा म्हणजे बारा विमाने पार्किंगची क्षमता ओझर विमानतळाची असल्याने येथून विमान सेवेचा विस्तार आवश्यक असल्याचे मत नाशिककर व्यक्त करीत आहे.

मुंबईचा ताण कमी होणार

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळावर २४ तासात ९६५ प्रवासी विमानांची ये- जा होते. त्यामुळे विमानतळावर विमाने पार्किंगची समस्या भेडसावते. त्यावर तोडगा म्हणून बडोदा, हैदराबाद तळावर विमाने पार्किंगसाठी जातात व पुन्हा प्रवासी घेण्यासाठी मुंबई विमानतळावर येतात. यात वेळ दोन्ही खर्च होते. मुंबईपासून ओझरचे हवाई अंतर पंचवीस मिनिटांचे असल्याने येथे पार्किंगची व्यवस्था शक्य आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना ही आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याने या बाबीचा विचार करून ओझर विमानतळाचे चालना देण्याची आवश्यकता आहे.

"नाशिकमध्ये आयटी उद्योग स्थापन करायचे झाल्यास त्यापूर्वी निरंतर विमानसेवा सुरू होण्याची आवश्यकता आहे. स्पाइस जेट कंपनीने गोवा, बंगलोर, हैदराबाद, दिल्ली या चार शहरांमध्ये सेवा देण्याचा करार केला आहे. परंतु, मार्चपासून ते आतापर्यंत तीनदा मुदतवाढ या कंपनीने घेतली आहे. त्यामुळे कंपनीला अल्टिमेटम देऊन निरंतर हवाई सेवा सुरू झाली पाहिजे."

- दत्ता भालेराव, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक.

"कोरोना पूर्वी देशातील निवडक शहरांमध्ये ओझर येथून विमानसेवा सुरू झाली होती. मात्र, कोरोनानंतर संपूर्ण सेवा विस्कळित झाली आहे. सध्या दिल्ली व अहमदाबाद व्यतिरिक्त सेवा नाही. कोरोनानंतर विमानसेवा सुरळीत होणे आवश्यक होते. उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबई विमानतळ आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे ओझर विमानतळावरून देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारी हवाईसेवा गरजेची आहे."

- राजेंद्र बकरे, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक.

nashik ozar airport
Nashik : 'मविप्र' संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

"देशातील महत्त्वाच्या शहरांचा विकास आयटी उद्योगामुळे झालेला आहे. आयटी उद्योगांसाठी हवाई सेवा नितांत गरजेची आहे. विमान सेवेमुळे प्रवाशांची वाहतूक जलदगतीने होते हा आतापर्यंतचा अनुभव असल्याने नाशिकच्या विकासासाठी विमानसेवा गरजेची आहे."

- अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

"केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने उड्डाण योजनेत नाशिकचा समावेश केला आहे. त्यामुळे ओझर विमानतळावरून राजधानी दिल्लीसह अहमदाबाद शहरांना जोडणारी विमानसेवा सध्या सुरू आहे. यापूर्वी बंगलोर, चेन्नई, कोलकत्ता या शहरांना जोडणारी हवाई सेवा सुरू करण्यात आली. मात्र कोरोनामुळे ही सेवा कागदावरच राहिली, आता नाशिकच्या विकासासाठी देशातील मेट्रो शहरांना जोडणारी विमानसेवा आवश्यक आहे."

- राजेंद्र आढाव, सचिव, महानगर, भाजप.

"ओझर व गांधीनगर ही दोन विमानतळे नाशिक शहर व परिसरात असल्याने येथून प्रवासी विमानांची वाहतूक होणे गरजेचे आहे. ओझरवरून दिल्ली व अहमदाबाद येथे सेवा सुरू असली तरी वेळेच्या बाबतीत मात्र अडचण आहे. चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, कोलकत्ता या शहरांसाठी हवाई सेवा गरजेची आहे." - सोनाली पवार, गृहिणी.

nashik ozar airport
धोकादायक घर, वाड्यांचे नळजोडणी तोडण्याच्या मनपा आयुक्तांच्या सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com