Complaint of former BJP President to Collector about banana crop insurance jalgaon news  
जळगाव

Banana Crop Insurance: केळी पिक विम्याच्या रकमेचे मेसेज, परंतु खात्यावर रक्कम नाही; जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार

सकाळ वृत्तसेवा

Banana Crop Insurance: केळी पिक विम्याची रक्कम खात्यावर टाकल्याचे मेसेज शेतकऱ्यांना पडले आहेत. परंतु प्रत्यक्षात रक्कम झालेली नसल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे केळी पिक विम्याच्या रक्कम मिळण्याची तांत्रिक अडचण ताबडतोब दूर करावी अशी मागणी भाजपा माजी उपाध्यक्ष उदयभान पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (Complaint of former BJP President to Collector about banana crop insurance jalgaon news)

याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की सन २०२२-२३या वर्षाच्या केळी पिक विमा पात्र शेतकऱ्यांना मिळण्याची प्रक्रिया ९ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू आहे. परंतु ती अत्यंत संथ गतीने सुरू आहे, त्यात अनेक समस्या दिसून येत आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात अप्रूव्ह दिसत असूनही प्रत्यक्ष पैसे जमा होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना कंपनीचे नुकसान भरपाईचचे पैसे जमा केल्याचे मेसेज दिले जात आहेत. परंतु, प्रत्यक्षात खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक करीत आहेत.

ज्या शेतकऱ्याचे नुकसानीचे पैसे मंजूर झालेले आहेत, ते त्यांच्या खात्यावर जमा होण्यास विमा कंपन्याना आदेश द्यावेत.

तसेच जून, जुलैमध्ये केळी पिकाचे वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे विमा कंपनी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पंचनामे केलेत मात्र, विमा कंपनी त्यांच्या भरपाईबाबत पेंडिंग स्टेटस्‌ दाखवित आहेत. त्यांच्या रकमाही खात्यात जमा कराव्या, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT