Former Mayor Jayashree Mahajan in discussion with the leader of Vanchit Bahujan Aghadi Adv. Prakash Ambedkar.  
जळगाव

Jalgaon News: पिंप्राळ्यात लवकरच भव्य दीक्षाभूमीची निर्मिती; माजी महापौरांची प्रकाश आंबेडकरांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नागपूरच्या धर्तीवर जळगावाती पिंप्राळा येथे भव्य दीक्षाभूमी करण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला आहे.

लवकरच ती उभारण्यात येईल, अशी माहिती माजी महापौर जयश्री महाजन यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकरांना दिली. (Construction of grand Deekshabhoomi soon at Pimprala jalgaon news)

ॲड.प्रकाश आंबेडकर जळगांव शहराच्या दौऱ्यावर आले होते. अजिंठा शासकिय विश्रामगृहात जळगाव शहराच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.

यावेळी सौ.महाजन यांनी सांगितले की, जळगाव महानगरपालिकेने पिंप्राळा परिसरातील हुडको भागात दहा एकर जागेत नागपूरच्या धर्तीवर दीक्षाभूमी करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे.

या जागेवर लवकरात लवकर दीक्षाभूमी उभी करण्यात येईल. या वेळी त्यांनी ॲड. आंबेडकरांना दीक्षा भूमीबाबत माहिती दिली व तसेच त्यांच्याकडून त्या संदर्भात काही सूचना जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्ष उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT