Jalgaon News: जिल्ह्यात 8 महिन्यांत 2 कोटींवर महिलांचा एसटी प्रवास; महिला सन्मान योजनेमुळे महामंडळाला नवसंजीवनी

Crowd of women while boarding ST
Crowd of women while boarding ST esakal

Jalgaon News : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत देणाऱ्या महिला सन्मान योजनेने एसटी महामंडळाला तारले आहे. भरघोस उत्पन्नाच्या रूपाने महामंडळाची भरभराट झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातून योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या आठ महिने १४ दिवसांत दोन कोटी २५ लाख ३१ हजार ४०६ महिलांनी प्रवास केला. (2 crore women in travel in district in 8 months jalgaon news)

यातून महामंडळाने प्रवासभाड्यापोटी ५९ कोटी ३१ लाख ४७ हजार ८४५ रुपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत असलेली ‘महिला सन्मान’ योजना १७ मार्च २०२३ ला सुरू केली. या योजनेला संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे.

Crowd of women while boarding ST
Jalgaon Loksabha Election: जळगाव लोकसभेची शिंदे गटच लढणार : नीलेश पाटील

जिल्ह्यातील ११ डेपोंनी महिला सन्मान योजनेत भरीव कामगिरी केली आहे. जिल्ह्यात योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन कोटी २५ लाख ३१ हजार ४०६ महिलांनी एसटी प्रवास केला आहे. यातून एसटी महामंडळाला ११८ कोटी ६२ लाख ९५ हजार ६९० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात महामंडळाने प्रवासभाड्यापोटी ५९ कोटी ३१ लाख ४७ हजार ८४५ रुपये वसूल केले आहेत. तेवढेच पैसे शासनाकडून महामंडळाला सवलतीपोटी उपलब्ध झाले आहेत.

‘'महिला सन्मान’ योजनेमुळे एस. टी. महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्णक्षमतेने भरली जाते. शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन एस. टी. महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.'' - भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, जळगाव

Crowd of women while boarding ST
Yashwantrao Chavan Vasahat Scheme: विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com