Jalgaon News  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘त्या’ संशयितांना पुन्हा पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

जळगााव : जिल्हा न्यायालया(Court) तारखेवर हजर करण्यासाठी आणलेल्या संशयितांवर न्यायालय आवारतच गोळीबाराच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडीत रवाना केले आहे. (court remanded suspects who were trying to shoot at suspects inside court premises to police custody jalgaon news gbp00)

भुसावळ येथील धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय २०) या तरुणाचा खुनाच्या गुन्ह्यात ११ महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला. त्याच दिवशी कारागृहातून भुसावळकडे आपल्या घरी निघाला असताना, पाळत ठेवून त्याच्यावर गावठी पिस्तुलांनी अंदाधुंद गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. पित्यादेखत मुलाची हत्या करण्यात आली.

धम्मप्रियचा पिता मनोहर आत्माराम सुरळकर याने साथीदार सुरेश इंधाटे, प्रवीण मेघे, विक्की वाघ यांच्या मदतीने मुलाच्या खुनाचा बदला घेण्याची योजना आखली होती. त्यानुसार सोमवारी (ता. २०) संशयिताना न्यायालयात हजर करताना त्याची वाट पाहत असलेल्या बुरखाधारी मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली .

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्याच्यापाठोपाठ इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस केाठडीची मुदत संपल्याने संशयितांना सोमवारी (ता. २७) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश आर. वाय. खंडारे यांनी संशयितांना १ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक निरीक्षक आर. पी. बागूल, उमेश भांडारकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT