The body was found here  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गोंडगाव येथे आढळला चिमुकलीचा मृतदेह; नरबळी की अत्याचारातून खून? तपासाचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : गोंडगाव (ता. भडगाव) येथे दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका आठवर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना मंगळवारी (ता. १) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. हा नरबळीचा प्रकार आहे की लैंगिक अत्याचारामुळे ही घटना घडली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

गोंडगाव (ता. भडगाव) येथील आठवर्षीय मुलगी रविवारी (ता.३०) दुपारी दोन ते सहा दरम्यान बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलिसात दाखल करण्यात आली होती. (dead body of missing 8 year old girl was found Jalgaon Crime News)

दरम्यान, पोलिसांकडून शोध सुरू असताना आज (ता.१) तिच्या घराला लागून असलेल्या मोकळ्या जागेत टाकलेल्या चाऱ्याच्या कुट्टीतून उग्र वास येत असल्याचे येथील काही नागरिकांना समजले. तेव्हा याठिकाणी जाऊन बघितले असता त्या बेपत्ता आठवर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला.

या वेळी नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता सहायक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक फौजदार चंद्रसेन पालकर, पोलिस कर्मचारी नरेंद्र विसपुते, रवींद्र पाटील, छबुलाल नागरे, भडगाव पोलिस अधिकारी दाखल झाले. या वेळी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता

मृत अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर गावातील नागरिकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला होता. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. यामुळे गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, गावातच तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

परंतु ही घटना कशामुळे घडली, याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ही घटना नरबळी की लैंगिंक अत्याचारातून घडली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT