जळगाव

Jalgaon Crime News : पोलिस अधीक्षकांकडून हद्दपारीचा चौकार; नशिराबाद दंगलीतील तिघांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा पोलिस अधीक्षकांनी बुधवारी (ता. २०) रेकॉर्डवरील चार गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश पारित केले. यात नशिराबाद दंगलीत सहभागी तिघांसह एरंडोल तालूक्यातील एका संशयितांचा समावेश आहे.

वाढती गुन्हेगारी आणि सण उत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्‍हा प्राशासन व पोलिस दलातर्फे प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीमच उघडण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत दाखल गुन्हे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची जंत्री तयार करुन उपअधीक्षक कार्यालय आणि तेथून जिल्‍हा पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात येते. (deportation order for 4 criminals on record by police jalgaon crime news)

गुन्ह्यातील वारंवारीता आणि गुन्हेगारांचे उपद्रवमुल्य पाहता अशा गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा सपाटाच पोलिसदलाने लावला आहे.

नशिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील टोळीचा म्होरक्या मुश्ताक शेख मुसा कुरेशी (वय ४२, रा. कुरेशी मोहल्ला), आरिफ शेख तस्लीम खान (वय २४), असलम खान अयाज खान (वय ३०) यांच्याविरुद्ध जळगाव एमआयडीसी, जामनेर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठ, पहुर पोलिस ठाणे, चाळीसगाव शहर, नशिराबाद, चाळीसगाव रेल्वे पेालिस अशा विवीध पेालिस ठाण्यांत ८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे गँगवार पद्धतीने करण्यात आलेले आहेत.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार होत असताना, नशिराबादच्या टोळीवर लक्ष जाताच त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आला होता.

त्याचप्रमाणे कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता. एरंडोल) याच्याविरुद्ध ४ गंभीर गुन्हे, २ प्रतिबंधात्मक कारवाया आणि तरीसुद्धा संशयीतांच्या वर्तनात सुधारणा न होता गुन्हेगारी कृत्यातील वारंवारीता पाहता जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मुंबई पोलिस अधीनियम कलम- ५६ (१) (ब)नुसार नशिराबदाच्या टोळीतील तिघा संशयीतांना दोन वर्षांसाठी आणि कासोदा येथील संशयिताला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश पारित केले.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्‍वर पाटील यांनी हद्दपारीची कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : दिल्ली पोलिसांकडून 'एक्सपायर्ड' अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ५३ कोटींचा खर्च; क्रीडा मंत्रालयाकडून ॲथलेटिक्स, बॉक्सिंगला प्राधान्य

'देशविरोधी शक्तींनी आंदोलन हायजॅक करू नये' दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर प्रीती झिंटा म्हणाली...'आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नका'

Live Updates Marathi : आमच्यासोबत काय घडले हे महत्त्वाचे नाही, विद्यार्थ्यांसोबत जे घडले ते योग्य आहे का? प्रियांका गांधींचा माध्यमांनाच सवाल

Amravati News: शासकीय योजनेतील विहीर गेली चोरीला; गावकऱ्यांची पोलिस ठाण्यात धाव

SCROLL FOR NEXT