crime sakal
जळगाव

धुळे : अठरा लाखांचे वेलदोडे ट्रकमधून लंपास

ट्रकमधून चोरट्यांनी तब्बल १८ लाखांचे वेलदोडे लंपास

सकाळ वृत्तसेवा

धुळे : तमिळनाडूतून जयपूर (राजस्थान) येथे विलायची घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून चोरट्यांनी तब्बल १८ लाखांचे वेलदोडे (वेलची) लंपास केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांनंतर नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बाबू थाहेर हुसेन (वय ५९, रा. करेमकामेंट, किटची पल्लायाम, सालेम, तमिळनाडू) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार २० जून २०२१ ला रवींद्रम एम.

यांच्या मालकीच्या रवींद्रम रोडलाइन्स ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या ट्रक (टीएन ५२, आर २८१४)वरील चालक जोशी जोसे व सजनलाल कोलम हे सालेम येथून वेलदोड्याच्या ७५ बॅगा भरून जयपूरकडे निघाले होते. २२ जूनला पहाटे ते मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा येथील रेल्वेपुलाखाली थांबले होते.

तेव्हा ट्रकचालक झोपलेले पाहून चोरट्याने ट्रकचे सील तोडून वेलदोड्याच्या प्रत्येकी ५० किलोच्या ३२ बॅगा चोरून नेल्या. चोरी झालेल्या या वेलदोडा मालाची किंमत १८ लाख रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT