doctor Adinath Patil commits suicide at KEM hospital jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळगावच्या डॉक्टरची केईएम रुग्णालयात आत्महत्या; ऑनड्यूटी मृतावस्थेत आढळला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील डॉ. संजय पाटील यांची दोघी मुले मुंबईच्या केईएम रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यापैकी मोठा मुलगा डॉ. आदिनाथ संजय पाटील ड्यूटीवर असताना, मृतावस्थेत आढळून आले.

डॉ. आदिनाथ यांनी स्वतःच विषारी इन्जेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून, त्यांच्या या कृत्यामागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आदिनाथ यांची क्षयरोग विभागात ड्यूटी होती. ( doctor commits suicide at KEM hospital jalgaon crime news)

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात फिजिशियन डॉ. संजय व डॉ. स्मिता पाटील यांचे एकवीरा हॉस्पिटल आणि निवास्थान आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ. आदिनाथ पाटील मुंबईतील केईएम रुग्णालयात सहा वर्षांपासून वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेत आहे.

सोबत लहान भाऊ अजिंक्य एमबीबीएसचे शिक्षण केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातच घेत आहे. डॉ. आदिनाथ पाटील यांची रविवारी (ता. ३०) क्षयरोग विभागात ड्यूटी होती. नेहमीप्रमाणे नॉर्मल आणि हसतखेळतच ते काम करीत होते.

नेमके घडलयं काय?

सोमवारी (ता. ३१) सकाळी आठच्या सुमारास केईएम रुग्णालयातील सफाई कर्मचारी कामावर आले. क्षयरोग विभागाचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडला असता, आत डॉ. आदिनाथ बेशुद्धावस्थेत आढळून आले. तातडीने कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारार्थ हलविले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

बेशुद्धावस्थेत आढळलेल्या डॉ. आदिनाथ यांच्या हातावर तीन वेळा इन्जेक्शन टोचल्याचे दिसून येत होते. त्यामुळे इन्जेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटनेची माहिती डॉ. आदिनाथ यांच्या कुटुंबीयांना जळगावला कळविण्यात आली. तातडीने आईवडिल मुंबईत दाखल झाले.

सायंकाळी पाचला विच्छेदन पूर्ण झाल्यावर मृतदेह त्यांना सोपविण्यात आला असून, ते जळगावकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. वडील डॉ. संजय पाटील, आई डॉ. स्मिता पाटील यांच्या पठडीत तयार झालेला आदिनाथ पाटील अत्यंत हुशार विद्यार्थी होता. इयत्ता बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.

त्याने नीट परीक्षेत राज्यातून दुसरा, तर देशातून ८४ वा क्रमांक पटकावला हेाता. केईएम रुग्णालयातही तो हसमुख, मनमिळावू, हुशार, प्रामाणिक विद्यार्थी होता, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे पदव्युत्तर विभागाचे उपअधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केईएम रुग्णालय सन्न

डॉ. आदिनाथ यांच्या मृत्यूमुळे केईएमच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना, तसेच पाटील परिवाराला मोठा धक्का बसला आहे. डॉ. आदिनाथ यांच्या मृत्यूमूळे कुटुंबीयांसह परिचित सुन्न झाले असून, त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आले नसून, याबाबत भोईवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT