Jalgaon Latest marathi news esakal
जळगाव

Jalgaon : विहिरीत बुडून वयोवृद्धाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील रोकडे शिवारातील एकाच्या विहिरीत वयोवृद्ध इसमाचा बुडून मृत्यू (Drowning Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (Elderly man drowns in well Jalgaon latest Marathi News)

याबाबत सविस्तर वृत्त, तालुक्यातील रोकडे शेतशिवारातील विहिरीत स्थानिक नागरिकांना एका इसमाचा मंगळवार, १२ रोजी मृतदेह आढळून आला. सदर घटनेबाबत ग्रामीण पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. व मृतदेहाला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

तत्पूर्वी सदर घटना हि मंगळवार रोजी ९:४५ वाजेच्या पूर्वी (वेळ नक्की नाही) घडली आहे. शंकर अर्जुन वारे (वय-६५) रा. बसस्थानकामागे झोपडपट्टी, चाळीसगाव असे मृत झालेल्या इसमाचा नाव आहे. तत्पूर्वी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वैधकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना शांतीलाल पगारे हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT