Nashik : दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड, वाघाड धरण ओव्हरफ्लो...

ozarkhed, waghad dam overflow latest marathi news
ozarkhed, waghad dam overflow latest marathi newsesakal

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार व मुसळधार पावसामूळे (Heavy Rain) तालुक्यातील सहाही धरणांच्या पाणी पातळीत (Water level) अतिवेगाने वाढ होत असून यात ओझरखेड धरणाने मांजरपाडा- देवसाने प्रकल्पाच्या कृपादृष्टीने आघाडी घेत शंभर टक्के भरले आहे.

त्या पाठोपाठ वाघाड धरणही साडे अकरावाजेच्या सुमारास भरले आहे. दरम्यान धरण (Dam) लाभ क्षेत्रातील शेतकरी व पाणी पूरवठा होत असलेल्या वणी- दिंडोरी शहरासह चांदवंड, येवला तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. (Ojharkhed Waghad dam overflow in Dindori taluka Nashik latest monsoon Update news)

दिंडोरी तालुक्यातील सहा धरणांपैकी एक असलेले ओझरखेड धरणाने जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच १००% भरल्याने अतिजलद व कमी कालवधीत भरण्याचा विक्रम केला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून दिंडोरी तालुक्यासह येवला, चांदवड तालुक्यासाठी वरदान ठरणारा देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प ९० ते ९५ टक्के पूर्ण होवून कार्यान्वीत झाल्याने देवसाने प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने उनंदा नदी पात्रात आल्याने उनंदा नदीवरील पूणेगांव धरणातील साठा वेगाने वाढू लागल्याने धरणाचे परिचालन सुचीनूसार पूणेगांव धरणातून काल सकाळ पासून उनंदा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने तसेच सप्तशृंगी गड पर्वत रांग, भातोडे, अहिवंतवाडी, पांडाणे, वणी परीसरात भागातील प्रमुख देव नदीसह अन्य छोटे ओहळ, नाले यांनाही पूर असल्याने या नदयांचे पाणी ओझरखेड धरणात जात असल्याने धरणाच्या पाणीसाठयात २४ तासात सुमारे साठ टक्यांनी वाढ होत धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

ozarkhed, waghad dam overflow latest marathi news
Nashik : विवाहितेची आत्महत्या; तिघांना अटक

ओझरखेड धरणाच्या सांडव्यातून बाहेर पडणारे पाणी पुढे उनंदा नदी पात्रात जावून सदरचे पाणी पालखेड धरणात जाणार असल्याने पालखेड धरणातून होणारा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान ओझरखेड पाठोपाठ वाघाड धरण ही शंभर टक्के भरले असून तिसगांव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील सर्वात करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत धरण ८० टक्यांवर गेल्याने रात्री पासून धरणातून 10366 क्यूसेक्स विसर्ग होत असल्यामूळे धरणाखालील फरशी पूल व ओझे - करंजवण व लखमापूर-म्हेळूस्के ला जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान धरणातून होत असलेल्या विसर्गामूळे उनंदा, कोलवन, कादवा नदी काठावरील रहिवाशी, नागरिकांना प्रशासनाने सावधानत सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान दिंडोरीचे तहसिलदार पंकज पवार यांनी सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान ओझरखेड धरणावर भेट देत पाणी पातळीची पाहाणी केली. तसेच वणी - नाशिक मार्गावरील अवनखेड येथील कादवा नदीवरील जुना पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणातील अनुक्रमॆ मागील वर्षीची, आजची जलसाठा टक्केवारी व कसांत सुरु असलेला विसर्ग क्यूसेक्समध्ये

पालखेड : ३० - ४९ ( ३०१८८)

करंजवण : ७ - ८० (१५६८०)

वाघाड : ३ - १००

ओझरखेड : २६ - १००

पुणेगाव : ७ - ५९ (३९१८)

तीसगांव : १ - ८८

ozarkhed, waghad dam overflow latest marathi news
Nashik : सप्तशृंगी गड राहणार महिनाभरासाठी बंद; असा असेल कालावधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com