Collector Ayush Prasad and Delhi officials discussing the site for ESIC hospital on Saturday with a map. esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर मारोती शोरूममागील जागेत ‘ईएसआयसी’ रुग्णालय; जिल्हाधिकाऱ्यांनी शोधून काढली जागा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयई) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जळगाव एमआयडीसीला भेट देऊन ईएसआयसी रुग्णालयासाठी योग्य जागा शोधून काढली आहे.

अजिंठा रोडवरील मारोती शोरूम मागील परिसरात ही जागा आहे. ही जागा कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयासाठी निश्‍चीत करण्यात आली. (ESIC Hospital will be built in premises behind Maruti Showroom jalgaon news)

या वेळी प्रांताधिकारी महेश सुधळकर, तहसिलदार नामदेव पाटील, एमआयडीसीचे अधिकारी वासूदेव सपकाळे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे दिल्लीतील अधिकारी उपस्थित होते.

झाडांची अडचण

‘एमआयडीसी’ही जागा कर्मचारी राज्य विमा महामंडळाला देण्यात येणार आहे. जागेवर ओपन स्पेस, अमेनिटी स्पेसला एकाच ठिकाणावरून एंट्री आहे. त्यामुळे ही स्पेस अदलाबदला करण्यात येणार आहे.

त्याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. याठिकाणी अनेक वर्ष जूनी नानाविध प्रकारची झाडे असल्याने ती तोडावी लागतील. त्यासाठी वनविभागाला कळवून परवानगी घेण्यात येईल.

काही विजेचे पोल आहेत. त्यासाठीचा खर्चही करावा लागणार आहे. यासाठी संबंधित विभागाला कळवून ती कामे लवकर कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष दिले जाईल. ईएसआयसी रुग्णालयाची पायाभरणी लवकर कशी होइल यासाठी प्रयत्न केले जातील अशी मााहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मान्सूनसाठी अजून प्रतीक्षा! नियमित पावसाची दमदार एन्ट्री कधी? हवामान खात्याचा मोठा अंदाज

"तू नक्की २०० धावा करशील, फक्त..." आयपीएलचा बादशहा बनलेल्या वैभव सूर्यवंशीला ललित मोदींचा सल्ला, तू मोठा सेलिब्रिटी..

Graduate Youth News : D.Ed झालं, MPSC दिली, पण...; कायमस्वरूपी नोकरी आणि लग्न न ठरल्याने 38 वर्षीय पदवीधर युवकानं उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीला अटक

Video : कमळी पडणार हृषि सरांच्या प्रेमात ! प्रोमो पाहून प्रेक्षक खुश "आमची अखेर प्रतीक्षा संपली.."

SCROLL FOR NEXT